पुणे - काँग्रेस पक्षाच्यावतीने आज माझ्याघराबाहेर जी निदर्शने करण्यात आली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. काँग्रेसच्या मागणीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीच माफी मागणार नाही. उलट काँग्रेसनेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर माफी मागावी, असा पलटवार खासदार गिरीश बापट यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने कोरोना देशात पसरविला, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार गिरीष बापट यांचे निवासस्थाना जवळ आंदोलन करण्यात आले. काँग्रेसकडून मोदींनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली. त्यानंतर खासदार गिरीश बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'कॉंग्रेसनेच माफी मागावी'
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही चुकीचे बोलले नाही. मोदी माफी मागणार नाहीत. कोरोना काळात काँग्रेस पक्षाच्यावतीने राजकारण करण्यात आले. ते निंदनीय असून काँग्रेसनेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागावी, असेही यावेळी बापट म्हणाले.
'महापालिकेत पुन्हा भाजपाचीच सत्ता'
महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारीही सगळे पक्ष करू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने एक दावा केला आहे. 15 मार्च नंतर महानगरपालिकेची मुदत संपल्यानंतर भाजपाचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यावर खासदार गिरीश बापट म्हणाले, तुम्ही आम्हाला 16 तारखेनंतर भेटा आणि महानगरपालिका निवडणुकीत भाजपाची सत्ता परत येईन, असा विश्वास गिरीश बापट यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - Sangli Gas Cylinder Blast : सांगलीत गॅस सिलेंडरचा स्फोट; चार घर जळून खाक, पाच जखमी