ETV Bharat / city

पर्यायी सरकार देण्यास आम्ही सक्षम - देवेंद्र फडणवीस - देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी सरकार प्रतिक्रिया

राज्य सरकारची वर्षपूर्ती झाल्यानंतरही त्यांनी केलेली ठोस कामे अद्यापही दिसत नाहीत. त्यामुळे हे सरकार निष्क्रिय असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Nov 25, 2020, 5:56 PM IST

Updated : Nov 25, 2020, 6:11 PM IST

पुणे - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत महाविकास सरकारच्या कारभारावर चौफेर टीका केली. सरकारची वर्षपूर्ती झाल्यानंतरही त्यांनी केलेली ठोस कामे अद्यापही दिसत नाहीत, असे सांगत महाविकास आघाडीचे सरकार निष्क्रिय असल्याची टीका फडणवीस यांनी केली. तसेच पर्यायी सरकार देण्यास आम्ही सक्षम असल्याचेही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस - विरोधी पक्षनेते, विधानसभा
  • सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत -

फडणवीस म्हणाले, या सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं अद्यापही पूर्ण केलेले नाहीत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात झालेल्या अतिवृष्टीनंतर घोषित केलेली नुकसानभरपाई अद्यापही नागरिकांना मिळाली नाही. विजेच्या सवलतीच्या संदर्भात जे घुमजाव सरकारने केले ते पाहता सरकारमध्ये समन्वय नाही. केवळ कामांना स्थगिती देणे इतकीच कामे या सरकारच्या काळात सुरू आहे. त्यामुळे अपेक्षाभंग झालेली जनता पदवीधर निवडणुकीच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त करेल. आम्ही विरोधी पक्ष म्हणून सक्षम आहोत, हे अनैसर्गिक सरकार जास्त वेळ चालणार नाही, हे सरकार जेव्हा ते पडेल तेव्हा आम्ही सक्षम सरकार देऊ.

  • शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नाही

शिवसेनेच्या एखाद्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावल्यानंतर त्याच्यावर महाराष्ट्र द्रोही असल्याचा ठपका ठेवला जातो. आपल्या अंगावर आले की पुढच्याला महाराष्ट्र द्रोही म्हणायचे ही शिवसेनेची भूमिका योग्य नाही. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या सर्वाधिक गुजरातपेक्षाही जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. त्यामुळे शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नाही हे शिवसेनेच्या नेत्यांनी समजून घेतले पाहिजे.

  • प्रताप सरनाईक यांनी स्वतःहून तपास यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांकडे गैर मालमत्ता असल्याचा आरोप केला होते. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, संजय राऊत यादी असल्याचा फक्त आरोप करतात. परंतु, प्रत्यक्षात ती ईडीला पाठवत नाहीत. ठोस पुरावा असल्यामुळेच ईडीने प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे सरनाईक यांनी क्वारंटाईन न होता स्वतःहून पुढे जाऊन तपास यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे.

  • जयंत पाटील यांनी पराभव मान्य केला

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात बोलताना भाजपने बोगस मतदारांची नोंदणी केल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जयंत पाटील यांनी पराभव मान्य केला आहे. पदवीधर निवडणुकीमध्ये ईव्हीएम नाही. त्यामुळे इकडे बोगस कशी नोंदणी होईल. पराभव समोर दिसल्यानंतर राष्ट्रवादीकडून अशा प्रकारचे वक्तव्य केले जातात.

  • संग्राम पाटील विजयी होतील

भाजपने पदवीधर मतदारसंघात मतदारांची चांगली नोंदणी केली आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. महाविकास आघाडी सर्व बाबतीत अपयशी ठरली असून त्यामुळे सरकारविरोधात मोठा असंतोष बघायला मिळतो. हा असंतोष संघटित होऊन जनता भाजपच्या उमेदवाराला मतदान करतील. भाजपचे संग्राम पाटील विजयी होतील, असा आम्हाला विश्वास असल्याचे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा - मी अर्थमंत्रालयाला १२० नेत्यांची यादी पाठवतो; मग बघू कारवाई होते का - संजय राऊत

हेही वाचा - विमानतळावर 6 कोटींचे कोकेन जप्त ; महिलेचा दुबईहून तस्करीचा प्रयत्न फसला

Last Updated : Nov 25, 2020, 6:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.