ETV Bharat / city

Chandrakant Patil Pune :'...तर आम्ही 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट लोकांना फ्रीमध्ये दाखवू' - आमच्या घरदारे विकून सामाजिक काम करतो चंद्रकांत पाटील

काश्मीरमधील हिंदू पळून गेला की नाही. तेथील महिलांवर अत्याचार झाले का नाही. तेथील काश्मिरी पंडितांच्या जागा हडपल्या नाही का..? या देशातील खरा इतिहास आत्ता तरुणांना दाखवण्याची गरज आहे. तुम्ही जर हा चित्रपट टॅक्स फ्री करत नसाल तर आम्ही आमच्या घरदारे विकून सामाजिक काम करतो. आम्ही लोकांना फ्री चित्रपट दाखवू, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

चंद्रकांत पाटील होळी जाळताना
चंद्रकांत पाटील होळी जाळताना
author img

By

Published : Mar 17, 2022, 8:28 PM IST

Updated : Mar 17, 2022, 8:37 PM IST

पुणे - 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटात जे काश्मीरचे भीषण चित्र दाखवण्यात आले आहे. ते वस्तुस्थिती नाही आहे का हे मान्य करा. काश्मीरमधील हिंदू पळून गेला की नाही. तेथील महिलांवर अत्याचार झाले का नाही. तेथील काश्मिरी पंडितांच्या जागा हडपल्या नाही का..? या देशातील खरा इतिहास आत्ता तरुणांना दाखवण्याची गरज आहे. तुम्ही जर हा चित्रपट टॅक्स फ्री करत नसाल तर आम्ही आमच्या घरदारे विकून सामाजिक काम करतो. आम्ही लोकांना फ्री चित्रपट दाखवू, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील
भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराची होळी साजरी करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविषयी विचारले असता पाटील म्हणाले, की संजय राऊत यांच्याविषयी बोलण्यात पॉईंट नाही. संजय राऊत यांच्याविषयी मी काहीच बोलणार नाही, असे यावेळी पाटील म्हणाले.

वर्षभराच्या वाईट प्रवृत्ती जाळण्याच प्रतीक होळी आहे. त्यामुळे गांवगाव हे सरकार ज्या पद्धतीने सामान्य माणसावर अन्याय करत आहे. एकाबाजूला आमदारांचे निधी 5 कोटी करायला या सरकारला जमते. त्यांच्या पीए आणि ड्रायव्हरला पगार द्यायला पैसे आहेत. पण या सरकारला शेतकऱ्यांना पैसे द्यायला वेळ नाही. एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही आहे. शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडले जात आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्यावतीने होळी निमित्ताने या वाईट गोष्टी जाळ्याच्या म्हणून आज होळी निमित्ताने या अपयशी महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराची होळी साजरी करण्यात आली आहे, असे यावेळी पाटील म्हणाले.

हेही वाचा - NCP Holi In Pune : ईडी, सीबीआय, महागाई अन् पुण्यातील भाजपच्या भ्रष्टाचाराची राष्ट्रवादीने केली होळी.. ठोकल्या बोंबा

Last Updated : Mar 17, 2022, 8:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.