ETV Bharat / city

बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणी भाजपाच्या आमदारावर गुन्हा दाखल - आमदारावर गुन्हा दाखल

राज्यभर गाजत असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा नोंदवला आहे.

गुन्हा दाखल
गुन्हा दाखल
author img

By

Published : Jul 7, 2021, 7:57 PM IST

पुणे - राज्यभर गाजत असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा नोंदवला आहे.

चंदुलाल पटेल भाजपा विधान परिषदेचे सदस्य

जळगाव येथील चंदुलाल पटेल हे भाजपाचे विधान परिषदेचे सदस्य आहेत. दरम्यान चंदूलाल पटेल यांचे नाव समोर आल्यानंतर गेल्या आठवड्यात आर्थिक गुन्हे शाखेचे पथक अटक वॉरंट घेऊन जळगावात गेले होते. पण याचा सुगावा लागल्यानंतर ते पसार झाले होते. त्यानंतर शोध घेत असताना कंडारेचा शोध लागला आणि त्याला अटक केली. मात्र आमदार पटेल पसार झाले. त्यांचे लोकेशन इंदोर येथे आल्यानंतर पथक त्याही ठिकाणी गेले होते. मात्र तेथून ते कारने पसार झाले. त्यानंतर त्यांचा शोध लागला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

कोट्यवधींचा घोटाळ्याचा आरोप

जळगाव येथील बीएचआर पतसंस्थेच्या मालमत्ता कमी किंमतीत विकून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. तब्बल 1 हजार कोटीहून अधिक किमतीचा हा घोटाळा असल्याने राज्यभरात हे प्रकरण गाजत आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी या घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार असलेल्या जितेंद्र कंडारे याला काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?
बीएचआर अर्थात भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती. या पतसंस्थेच्या देशभरातील सात राज्यांमध्ये 264 शाखा असून 28 हजार ठेवीदार आहेत. तर पतसंस्थेच्या खात्यामध्ये 1100 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. दरम्यान मुदत संपल्यानंतर देखील ठेवीच्या रकमा परत मिळत नसल्यामुळे 2015 मध्ये हा घोटाळा समोर आला होता. यानंतर भाईचंद हिराचंद संस्थेच्या 13 संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी शासनाने या पतसंस्थेवर अवसायक म्हणून जितेंद्र कंडारे यांची नियुक्ती केली होती. यानंतर बीएचआर पतसंस्थेच्या मालमत्ता विकून त्यातून येणाऱ्या पैशांमधून ठेवीदारांच्या ठेवी परत न करता काही ठराविक लोकांना या मालमत्ता कवडीमोल भावात विकून घोटाळा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात नोव्हेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा - Modi Cabinet Expansion : नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भागवत कराड, भारती पवार मोदींच्या मंत्रिमंडळात, 43 मंत्री घेणार शपथ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.