ETV Bharat / city

Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्रातून कोश्यारी यांची हकालपट्टी झालीच पाहिजे; संभाजी ब्रिगेडची मागणी - demands sambhaji brigade

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल हे नेहेमी चुकीची माहिती देतात ते इतिहास चुकीचं दाखवतात. ते जातीयवादी आहे. राज्याचे राज्यपाल हे भाजपचे एजंट असून ते भाजप सांगेल, त्याप्रमाणे काम करत आहे. मुंबईची बदनामी ही राज्याची बदनामी आहे, म्हणून राज्यपाल यांची हकालपट्टी व्हायला हवी अशी आमची मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी यावेळी केली आहे.

संभाजी ब्रिगेडची मागणी
संभाजी ब्रिगेडची मागणी
author img

By

Published : Jul 30, 2022, 4:21 PM IST

पुणे - गुजराती व राजस्थानी लोकांनी पैसे काढून घेतले तर मुंबईत पैसेच शिल्लक राहणार नाही. देशाची आर्थिक राजधानीही राहणार नाही, या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर संभाजी ब्रिगेड चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.

संभाजी ब्रिगेडची मागणी

राज्यपाल हे नेहेमी चुकीची माहिती देतात ते इतिहास चुकीचं दाखवतात. ते जातीयवादी आहे. राज्याचे राज्यपाल हे भाजपचे एजंट असून ते भाजप सांगेल, त्याप्रमाणे काम करत आहे. मुंबईची बदनामी ही राज्याची बदनामी आहे, म्हणून राज्यपाल यांची हकालपट्टी व्हायला हवी अशी आमची मागणी संतोष शिंदे यांनी यावेळी केली आहे.

काय म्हटले आहे राज्यपालांनी ? : मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्यामुळेच अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला.

मराठी माणसाला कमी लेखन्याचा हेतू नाही? : काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात, मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास! : पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे," असे राज्यपाल कोश्यारी यांनी नमूद केले.

वादग्रस्त वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे ( controversial statement ). महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari ) यांनी केले होते. या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे म्हणाले, मी त्यांच्या मताशी सहमत नाही.

हेही वाचा - महाराष्ट्राचा अपमान केल्यास कोल्हापुरी चप्पल दाखवू - उद्धव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.