पुणे - देशसेवेचे स्वप्न घेऊन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत ( National Defense Academy Pune ) दाखल झालेल्या मुलाचा संशायस्पद मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्रबोधिनी प्रशासनाने दिले आहेत.
जी. प्रत्युष ( वय 18 ) असे या तरुणाचे नाव आहे. प्रत्युष हा मुळचा बेंगळुरुचा राहणारा असून, 147 व्या तुकडीचा विद्यार्थी होता. 7 फेब्रुवारीलाच तो प्रबोधिनीत दाखल झाला होता. मात्र, 8 फेब्रुवारीला त्याचा मृत्यू झाला ( Student Dies Nda Pune ) आहे.
प्रत्युष मंगळवारी ( दि 9 फेब्रुवारी ) त्याच्या हॉस्टेलच्या खोलीसमोर बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यानंतर अनेक प्रयत्न करुनही तो शुद्धीवर न आल्याने त्याला प्रबोधिनीच्या परिसरातील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्रबोधिनी प्रशासनाने दिले आहेत.
हेही वाचा - Amol Palekar In Hospitalized : अमोल पालेकर रुग्णालयात, आरोग्याबाबत समोर आली 'ही' महत्वाची माहिती