ETV Bharat / city

Sharad Pawar On Babasaheb Purandare : बाबासाहेब पुरंदरे यांच्याऐवढा अन्याय छत्रपती शिवाजी महाराजांवर कोणीही केला नसेल - शरद पवार - छत्रपती शाहू महाराज

बाबासाहेब पुरंदरे ( Babasaheb Purandare ) यांच्या एव्हढा अन्याय छत्रपती शिवाजी महारांजावर ( Chhatrapati Shivaji Maharaj ) कोणीही केला नसेल अशी टीका खासदार शरद ( Sharad Pawar ) वापारांनी केली आहे. ते डॉ. श्रीमंत कोकाटे ( Dr. Shrimant Kokate ) लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथांच्या प्रकाशनवेळी बोलत होते.

Sharad Pawar On Babasaheb Purandare
शरद पवार
author img

By

Published : Jul 23, 2022, 3:09 PM IST

Updated : Jul 23, 2022, 9:46 PM IST

पुणे - काही ग्रंथ काही पुस्तके ही महाराष्ट्रात खूप लोकप्रिय झाली. त्या पुस्तकांचे हजारो प्रत निघाले. लोकांनी घराघरात ठेवले, ते वाचले देखील.ते पुस्तक कोणाचे असेल तर बाबासाहेब पुरंदरे ( Babasaheb Purandare ) यांचं ते पुस्तक आहे. बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे त्यांचं लिखाण हे माझ्या मते शिव छत्रपतीवर इतका अन्याय कोणीही केलेला नाही असे, विधान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Nationalist Congress President Sharad Pawar ) यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आत्ता पुन्हा एकदा शिवचरित्र, पुरंदरे वाद उद्धभवण्याची शक्यता आहे.

शरद पवारांचे भाषण

रामदास यांचे योगदान काय - डॉ श्रीमंत कोकाटे ( Dr. Shrimant Kokate ) लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथांचे प्रकाशन पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज ( Chhatrapati Shahu Maharaj ) हे होते यावेळी ते बोलत होते. पवार पुढे म्हणाले की, बाबासाहेब पुरंदरे यांनी जे काही लिखाण केल आहे. जी काही मांडणी केली आहे, ती मांडणी ज्याला सत्त्यावर विश्वास आहे त्याला कधीही मान्य होणार नाही. त्या व्यक्तीचं महत्त्व वाढवण्याचा काम केलं गेलेलं आहे. रामदास यांचं योगदान काय आहे.असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. एक चांगली गोष्ट झाली आहे की, महाराष्ट्र सरकारने अलीकडे उत्तर खैरादून यांना दादाजी कोंडेव पुरस्कार देण्याचं निश्चय केला. त्याचे वाद विवाद झाले, 2008 साली राज्य सरकारने दादाजी कोंडेव हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मार्गदर्शक गुरू होते की नव्हते? याच सखोल अभ्यास करण्याचं काम केलं. त्यानंतर अभ्यास केल्यानंतर हा निकष काढण्यात आला. दादाजी कोंडदेव यांचा शिवछत्रपती यांच्याशी काहीही संबंध नव्हता. तेव्हा छत्रपती यांना कोणी दिशा दिली असेल तर राजमाता जिजाऊ यांनी दिली आहे असेही यावेळी पवार म्हणाले.

हेही वाचा - धनुष्यबाण चिन्हासाठी एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे निवडणूक आयोगासमोर आमनेसामने

सत्य गोष्टी अनेकांना न पटणाऱ्या - आजवर शिव छत्रपती वर जे लिखाण केलं गेलं त्यात काही ठिकाणी सत्याचा आधार आहे, काही ठिकाणी अतिशयोक्ती आहे, तर काही ठिकाणी धादांत खोटं सांगितलं गेलं आहे. श्रीमंत कोकाटे यांनी सत्याच्या आधारावर हे पुस्तक लिहिलं. शिवछ्रपतींचे राज्य हे कधी भोसल्यांच राज्य झालं नाही, ते रायतेच राज्य झालं. शिव छत्रपती विषयी धर्मांध विचार मांडण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. तो कसा चुकीचा आहे ते श्रीमंत कोकाटे यांनी सदोहरण स्पष्ट केलं. रायगडावरील शिव छत्रपतीची समाधी महात्मा फुले यांनी शोधली. सत्य गोष्टी अनेकांना न पटणाऱ्या आहेत. त्यांच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. सत्यावर आधारित, नव्या पिढीला मार्गदर्शन ठरणारा वास्तव इतिहास आपल्याला पाहिजे. त्यासाठी संशोधकांनी एकत्र यावे. संसदेचे अधिवेशन झाल्यावर आपण भेटू अस, देखील यावेळी पवार म्हणाले.

हेही वाचा - Aaditya Thackeray : औरंगाबादेत आदित्य ठाकरेंची तोफ बंडखोरांवर धडालली; 'सगळे नीट चालले असताना गद्दारी का'

Last Updated : Jul 23, 2022, 9:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.