पुणे - राज्यासह पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. पुणे शहरात दर दिवशी 4 ते 5 हजार कोरोनोबाधितांची भर पडत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने 1 मे पर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असं असतानाही काही नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या पुणेकरांनी नियमांचं पालन करावं, यासाठी शिवसेनेच्यावतीने जगजागृती करण्यात येत आहे. जनजागृतीसाठी 40 फुटी कोरोना विषाणूचे चित्र काढण्यात आले आहे.
पुणे शहरात कडक संचारबंदी असतानाही काही लोक हे अत्यावश्यक सेवेचे कारण पुढे करून शहरात फिरत आहेत. शहरात गर्दी वाढल्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. नागरिकांनी घरची राहावे, यासाठी आता पुणे शिवसेनेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. शिवसेनेच्या वतीने नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी एक 40 फुटी कोरोना विषाणूचे चित्र काढण्यात आले आहे. या चित्रा खाली 'विनाकारण फिरणाऱ्या गाढवांनो नियम पाळा आणि यम टाळा' असा मथळा छापण्यात आला आहे.
विविध थीमच्या माध्यमातून जनजागृती
स.प.महाविद्यालयाच्या चौकात 40 फुटी कोरोनाचे चित्र साकारून जनजागृती करण्यात येत आहे. याच पद्धतीने विविध थीम घेऊन नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती शिवसैनिक गौरव सिन्नरकर यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - ऑक्सिजनसाठी केंद्राने राज्याला दिलेला निधी कुठे गेला? भाजप आमदाराची चौकशीची मागणी