पुणे - राज्यसरकारकडून 7 तारखेपासून म्हणजेच नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेच्या दिवशी राज्यातील मंदिरे सुरू करण्यात आली. मंदिर व भक्तांवर अवलंबून असणाऱ्या व्यापाऱ्यांना मंदिर बंद असल्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. पण, मंदिर सुरू झाल्यानंतर मंदिर प्रशासनाकडून फुल, हार तसेच इतर साहित्य स्वीकारणे बंद केल्याने पूजासाहित्य विक्रेत्यांना फटका बसत आहे.
पूजा साहित्य विक्रेत्यांचे होत आहे हाल
कोरोना काळापासून मंदिर बंद होती. त्यामुळे मंदिरावर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांवर मोठे आर्थिक संकट ओढावले होते. आता राज्य सरकारने मंदिरे उघडण्याची परवानगी दिली. यामुळे आर्थिक संकटातून बाहेर पडण्याच्या व्यापाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, मंदिर प्रशासनाकडून पूजेचे साहित्य, हार, फुल स्वीकारले जात नाही. यामुळे अनेक व्यवयिकांना याचा फटका बसत आहे.
हेही वाचा - सभेच्या वेळी आपण पावसात भिजलो तर काय घडतं.. अजित पवारांनी जागवल्या 'त्या' सभेच्या आठवणी