ETV Bharat / city

मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदी नगरसेवक वसंत मोरे यांची नियुक्ती

author img

By

Published : Mar 4, 2021, 3:59 AM IST

पुणे शहर मनसेच्या अध्यक्षपदी मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसेच्या शहराध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना दिले. दरम्यान मनसेचे सध्याचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांना प्रदेश उपाध्यक्ष पदी नेमण्यात आले आहे.

वसंत मोरे
वसंत मोरे

पुणे - शहर मनसेच्या अध्यक्षपदी मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसेच्या शहराध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना दिले. दरम्यान मनसेचे सध्याचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांना प्रदेश उपाध्यक्ष पदी नेमण्यात आले आहे.

पुणे महापालिका निवडणूक अवघ्या 1 वर्षावर येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने मनसेने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, वसंत मोरे यांच्या रुपाने एक आक्रमक चेहरा पुणे मनसेला मिळाला आहे. पुणे शहरातील मनसेची आगामी व्यूहरचना ठरवण्यासाठी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. तसेच बुधवारी पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

वसंत मोरे यांचा परिचय

मनसेच्या शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेले वसंत मोरे हे पुण्यातील कात्रज भागाचे प्रतिनिधित्व करतात. या भागातून नगरसेवक म्हणून ते निवडून आलेले आहेत. मनसेला 2012च्या निवडणुकीत पुणे शहरात घवघवीत यश मिळाले होते. त्यावेळी वसंत मोरे यांच्याकडे गटनेते पदाची जबाबदारी होती. 2017 च्या निवडणुकीत मात्र मनसेला जबर फटका बसला या निवडणुकीत मनसेचे केवळ 2 च नगरसेवक निवडून आले. त्यात वसंत मोरे यांचा समावेश आहे, शहराच्या विविध मुद्द्यांवर आक्रमक शैलीत आणि वेगळ्या पद्धतीने वसंत मोरे हे आंदोलन करत असतात. आता शहर मनसेला उभारी देण्यासाठी वसंत मोरे काय प्रयत्न करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. मोरे यांच्या नियुक्तीनंतर पुणे शहर मनसेच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.