पुणे - पुणे शहरातून महिला अत्याचाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षकाने पोलीस उपनिरीक्षक महिलेसोबत अनैसर्गिक संबंध ठेवले. त्यानंतर या महिलेस सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - खोटे लग्न करून पैसे उकळणारी टोळी गजाआड
- खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -
हरीश सुभाष ठाकूर (वय 40) असे गुन्हा दाखल झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. त्यांच्याविरोधात भा द वि 307, 494, 498, 377, 506 सह पॉक्सो कलम 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार 2013 पासून वारंवार घडला आहे. खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी संबंधित सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातच काम करणाऱ्या 33 वर्षीय पोलीस उपनिरीक्षक महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.
- मुलासमोर अनैसर्गिक संभोग -
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांना आरोपीने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे, अशी खोटी माहिती दिली. तक्रारदारसोबत विवाह केला असता लग्नानंतर आजपर्यंत आरोपीने सतत शारीरिक व मानसिक छळ केला. विवाहबाह्य संबंध ठेवून तक्रारदारासोबत वारंवार अनैसर्गिक संभोग केला. आरोपीने त्यांच्या ५ वर्षाच्या मुलासमोरही तक्रारदारासोबत अनैसर्गिक संभोग केला.
- सर्विस रिव्हॉल्व्हरमधून झाडली गोळी -
दरम्यान, 2015 मध्ये आरोपीने नवी मुंबई येथील राहत्या घरात तक्रारदारावर सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. यामध्ये तक्रारदाराच्या बोटाला जखम झाली. आरोपीच्या दबावामुळे तक्रारदाराने इतके दिवस पोलिसात तक्रार दिली नाही. परंतु, लग्नाची नोंदणी करण्यास आरोपीने टाळाटाळ केल्यानंतर तक्रारदाराने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची २४ कोटी ६३ लाखांची फसवणूक