ETV Bharat / city

Anil Parab Replied To Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमैयांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही - अनिल परब

भाजप नेते किरीट सोमैया ( kirit Somaiya ) म्हणजे कोणती एजन्सी नाही आणि त्यांना उत्तर देण्यास मी बांधील नाही. ज्या तपास यंत्रणा आहे, त्यांना मी उत्तर देत आहे. सोमैया यांना कोणत्या तक्रारी असतील तर त्यांनी संबंधित यंत्रणाकडे तक्रारी कराव्या, असे मत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब ( Anil Parab Crticized ) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Anil Parab Replied To Kirit Somaiya
Anil Parab Replied To Kirit Somaiya
author img

By

Published : Jun 1, 2022, 7:30 PM IST

पुणे - भाजप नेते किरीट सोमैया ( kirit Somaiya ) म्हणजे कोणती एजन्सी नाही आणि त्यांना उत्तर देण्यास मी बांधील नाही. ज्या तपास यंत्रणा आहे, त्यांना मी उत्तर देत आहे. माझा कोकणातील जमीन व्यवहार ( Anil Parab Case ) पारदर्शक असून विभास साठे यांच्याकडून मी जमीन विकत घेतली आणि पुढे त्याची विक्री केली आहे. सोमैया यांना कोणत्या तक्रारी असतील तर त्यांनी संबंधित यंत्रणाकडे तक्रारी कराव्या, असे मत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब ( Anil Parab Crticized ) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

काय म्हणाले अनिल परब? - महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने 75 व्या वर्षात पदार्पण केले आहे. पहिली बस ज्या दिवशी धावली त्याचे औचित्य साधून त्याच मार्गावर पहिली ई-बस सुरू करण्यात आली आहे. ज्याएसटी कर्मचाऱ्यांनी 25 वर्ष कोणताही अपघात न करता सेवा दिली. त्यांचा 25 हजार रुपये देऊन सत्कार करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्ष एसटी स्थानकावर खर्च नाही. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी अद्यावत बस स्थानक तयार करण्यात येईल. बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर हे काम करण्यात येणार आहे. दुर्देवाने एसटी बस पोर्ट औरंगाबाद आणि पनवेल येथे मान्यता मिळालेली नाही. एसटी पूर्वपदावर येत असून लवकरच चांगल्या सुविधा देण्यात येतील. पुण्यातील शिवाजीनगर स्थानक याठिकाणी मेट्रो काम सुरू असून त्या जागी नवीन स्थानक निर्मिती बाबत चर्चा सुरू आहे. ई-बस पहिल्या टप्प्यात 150 मिळणार असून त्या कोणत्या जागी नेमायच्या आहे त्याबाबत अभ्यास करून सेवा सुरू केली जाईल. ई-बस चालवताना त्यासोबत पायाभूत सुविधा महिन्याभरात तयार करण्याबाबत अभ्यास पूर्ण होईल. कोरोना पूर्व सेवा जवळ आम्ही पोहचत आहे. एसटी स्थानकवरील खासगी सेवा हळूहळू बंद करण्यात येत असल्याचे परब म्हणाले.

एक हजार बस सेवेत आणणार - इंधन खर्च मोठ्या प्रमाणत वाढला आहे. वर्षभरात सीएनजीच्या एक हजार बस सेवेत आणणार आहे. ई-बस, सीएनजी बस सेवा करण्यात येणार आहे. ज्या मार्गावर प्रवासी कमी आहे. त्या जागी कमी फेऱ्या करण्यात येऊन इंधन वाचविण्यात येणार आहे. इंधन खर्च एसटी तोट्यात जाण्यासाठी एक कारण आहे. त्यामुळे त्यावरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. एसटीला सध्या 11 हजार कोटीचा तोटा आहे, असे यावेळी शेखर चेन्न यांनी सांगितले.

हेही वाचा - Sachin Vaze : सचिन वाझे माफीचा साक्षीदार; अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.