ETV Bharat / city

पानिपत : राजघराण्यातील महिलांना नाचताना दाखविणे क्लेशदायक; पेशव्यांच्या वंशजांची खंत - panipat

सिनेमाच्या माध्यमातून पेशव्यांच्या पराक्रमाची गाथा मांडली जात असताना पेशव्यांच्या वंशजांवर केलेला हा स्पेशल रिपोर्ट....

पानिपत
पेशव्यांचे वंशज
author img

By

Published : Dec 9, 2019, 8:33 AM IST

Updated : Dec 9, 2019, 10:33 AM IST

पुणे- नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पानिपत चित्रपटातून मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास हिंदुस्थानच्या जनतेसमोर मांडला आहे. गेल्या काही काळात बाजीराव मस्तानी, पानिपत अशा चित्रपटांतून पेशवा या मराठेशाहीतील योद्ध्यांचा दुर्लक्षित पराक्रम जगासमोर भव्य स्वरूपात येतो आहे. एकेकाळी भारतावर साम्राज्य प्रस्थापित केलेल्या या पेशव्यांचा इतिहास पाहिला तर त्यांच्या वंशजांना पेशव्यांच्या राजधानी पुणे शहरात प्रवेश नव्हता. त्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली होती. आणि बऱ्याच काळाने पुन्हा पुण्यात येऊ पाहणाऱ्या त्यांच्या वंशजांना ज्या पुण्यात त्यांच्या पूर्वजांचे साम्राज्य होते, त्या पुण्यात चक्क भाड्याच्या घरात राहायची वेळ आली होती.

सिनेमाच्या माध्यमातून पेशव्यांच्या पराक्रमाची गाथा मांडली जात असताना पेशव्यांच्या वंशजांवर केलेला हा स्पेशल रिपोर्ट....

पानिपतच्या युद्धानंतर पेशवाईला मोठा धक्का बसला. या धक्क्यानंतर सहा महिन्यांतच नानासाहेब पेशवे यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर वयाच्या 16 व्या वर्षी माधवराव पेशव्यांच्या खांद्यावर पेशवाईची धुरा आली. त्यांनी महादजी शिंदे, नाना फडणवीस यांच्या मदतीने मराठ्यांचे राज्य विस्तारले. मात्र, नंतर हळूहळू पेशवाईची रया गेली. देशात ब्रिटिशांचा अंमल वाढला असताना दुसरा बाजीरावने ब्रिटिशांशी तह केला. पुढे ब्रिटिशांनी दुसरा बाजीराव यांना ब्रह्मव्रतला पाठवले. त्यानंतर त्यांना कैदही केले. तर अमृतराव पेशवे यांनाही पुणे सोडून वाराणसीला पाठवण्यात आले. पेशव्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली. नंतरच्या पेशव्यांना ब्रिटिशांनी पुण्यात येऊ दिले नाही. पेशवे पुन्हा पुण्यात आले तर लोक त्यांच्यासोबत येतील आणि ब्रिटिशांच्या विरोधात कारस्थान करतील, अशी भीती ब्रिटीशांना होती. त्यामुळे नंतरच्या पेशव्यांना पुण्यात येऊ दिले गेले नाही. अखेर 1930 ला पेशव्यांची आठवी पिढी पुण्यात येऊ शकली.

शनिवाड्याच्या मालकांनाच पुण्यात राहायला घर नव्हते-

एकेकाळी पुण्यातल्या भव्य शनिवार वाड्यात राहणाऱ्या आणि देशावर राज्य करणाऱ्या पेशव्यांच्या या वंशजांना पुण्यात आल्यावर राहायला घरही नव्हते. पेशव्यांच्या या वंशजांनी पुण्यात भाड्याने घर घेऊन राहायला सुरुवात केली. नंतरच्या काळात नोकरी स्वीकारत त्यांनी स्वतःची वास्तू उभी केली. पेशव्यांची नववी आणि दहावी पिढी सध्या पुण्यात राहते. पुण्यातल्या डेक्कन परिसरात ते राहायला आहेत. एकेकाळी देशावर राज्य करणाऱ्या पेशव्यांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष झाल्याची खंत पेशव्यांचे हे वंशज व्यक्त करतात.

इतिहासाचे योग्य चित्रण झाले पाहिजे-

शिवाजी महाराजांनंतरचा इतिहास आपण विसरून गेलो. महाराजांनंतर मराठ्यांनी जो पराक्रम केला, तो दुर्दैवाने आपल्याला माहीत नाही. आता बाजीराव मस्तानी असेल किंवा नुकताच आलेला पानिपत चित्रपट असेल या चित्रपटांच्या माध्यमातून हा इतिहास समोर येतो आहे. याचा निश्चितच आनंद आणि अभिमान आहे. मात्र, मनोरंजनाच्या नावाखाली अशा चित्रपटांमध्ये राजघराण्यातील महिलांना नाचताना दाखवणे क्लेशदायक आहे. असे व्हायला नको. इतिहासाचे योग्य चित्रण झाले पाहिजे. खरा इतिहास समोर आला पाहिजे, अशी अपेक्षा देखील ते व्यक्त करतात.

Intro:सिनेमाच्या माध्यमातून पेशव्यांच्या पराक्रमाची गाथा मांडली जात असताना पेशव्यांच्या वंशजांवर एक स्पेशल रिपोर्टBody:mh_pun_02_peshwa_dinesty_today_special_story_7201348

anchor
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पानिपत चित्रपटातून मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास हिंदुस्थान च्या जनतेसमोर मांडला आहे...गेल्या काही काळात बाजीराव मस्तानी, पानिपत अशा चित्रपटातून पेशवा या मराठेशाहीच्या योध्याचा दुर्लक्षित पराक्रम जगा समोर भव्य स्वरूपात येतो आहे...एकेकाळी भारतावर साम्राज्य प्रस्थापित केलेल्या या पेशव्याचा इतिहास पाहिला तर त्यांच्या वंशजांना पेशव्यांच्या राजधानी पुणे शहरात प्रवेश नव्हता, त्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली होती आणि बऱ्याच काळाने पुन्हा पुण्यात येऊ पाहणाऱ्या त्यांच्या वंशजांना ज्या पुण्यात त्यांच्या पूर्वजांचे साम्राज्य होते त्या पुण्यात चक्क भाड्याच्या घरात राहायची वेळ आली होती.....पानिपतच्या युद्धानंतर पेशवाईला मोठा धक्का बसला या धक्क्यात नानासाहेब पेशवे यांचं निधन झाले पानिपत नंतर सहा महिन्यातच नानासाहेब पेशवे वारले त्यांच्यानंतर वयाच्या 16 व्या वर्षी माधवराव पेशव्यांच्या खांद्यावर पेशवाईची धुरा आली त्यांनी महादजी शिंदे , नाना फडणवीस यांच्या मदतीने मराठ्यांचे राज्य विस्तारले मात्र नंतर हळूहळू पेशवाईची रया गेली...देशात ब्रिटिशांचा अंमल वाढला असताना दुसरा बाजीराव ने ब्रिटिशांशी तह केला पुढे ब्रिटिशांनी दुसरा बाजीराव यांना ब्रह्मव्रत ला पाठवले पुढे त्यांना कैद ही केले... तर अमृतराव पेशवे यांना पुणे सोडून वाराणसीला पाठवले पेशव्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली नंतरच्या पेशव्यांना ब्रिटिशांनी पुण्यात येऊ दिले नाही पेशवे पुन्हा पुण्यात आले तर लोक त्यांच्या सोबत येतील आणि ब्रिटिशांच्या विरोधात कारस्थान करतील अशी भीती ब्रिटीशांना होती त्यामुळे नंतरच्या पेशव्यांना पुण्यात येऊ दिले गेले नाही अखेर 1930 ला पेशव्यांची आठवी पिढी पुण्यात येऊ शकली मात्र एकेकाळी पुण्यातल्या भव्य शनिवार वाड्यात राहणाऱ्या आणि देशावर राज्य करणाऱ्या पेशव्यांच्या या वंशजांना पुण्यात आल्यावर राहायला घरही नव्हते पेशव्यांच्या या वंशजांनी पुण्यात भाड्याने घर घेऊन राहायला सुरुवात केली नंतरच्या काळात नोकरी पेशा स्वीकारत त्यांनी स्वतःची वास्तू उभी केली पेशव्यांची नववी आणि दहावी पिढी सध्या पुण्यात राहते पुण्यातल्या डेक्कन परिसरात ते राहायला आहेत.... एकेकाळी देशावर राज्य करणाऱ्या पेशव्यांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष झाल्याची खंत पेशव्यांचे हे औषध व्यक्त करतात शिवाजी महाराजांच्या नंतर चा इतिहास आपण विसरून गेलो महाराजांच्या नंतर मराठ्यांनी जो पराक्रम केला तो दुर्दैवाने आपल्याला माहीत नाही आता बाजीराव मस्तानी असेल किंवा नुकताच आलेला पानिपत चित्रपट असेल या चित्रपटांच्या माध्यमातून हा इतिहास समोर येतो आहे याचा निश्चितच आनंद आणि अभिमान आहे मात्र मनोरंजनाच्या नावाखाली अशा चित्रपटांमध्ये राजघराण्यातील महिलांना नाचताना दाखवणे क्लेशदायक आहे असं व्हायला नको इतिहासाचे योग्य चित्रण झाले पाहिजे खरा इतिहास समोर आला पाहिजे अशी अपेक्षा देखील ते व्यक्त करतात.....
Byte उदयसिह पेशवा, पेशव्यांचे वंशज
Byte जय मंगलाराजे पेशवा, उदयसिंह यांच्या पत्नी
Conclusion:
Last Updated : Dec 9, 2019, 10:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.