ETV Bharat / city

Death In Pimpri-Chinchwad : आठ वर्षीय मुलाच्या डोक्यात दगड घालून केला खून - Death In Pimpri-Chinchwad

पिंपरी-चिंचवडमध्ये आठ वर्षीय मुलाच्या डोक्यात सिमेंटचा दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लक्ष्मण देवासी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. लक्ष्मण हा रविवारी बेपत्ता झाला होता, या प्रकरणी चिखली पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. परंतु, त्याच्या काही तासांनी घराच्या जवळच लक्ष्मणचा मृतदेह आढळल्याने हा प्रकार समोर आला.

आठ वर्षीय मुलाच्या डोक्यात दगड घालून केला खून

author img

By

Published : Apr 18, 2022, 1:07 PM IST

पुणे (पिंपरी-चिंचवड)- पिंपरी-चिंचवडमध्ये आठ वर्षीय मुलाच्या डोक्यात सिमेंटचा दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवार (दि. 18 एप्रिल)रोजी घटडली आहे. लक्ष्मण देवासी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. लक्ष्मण हा रविवारी बेपत्ता झाला होता, या प्रकरणी चिखली पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. परंतु, त्याच्या काही तासांनी घराच्या जवळच लक्ष्मणचा मृतदेह आढळल्याने हा प्रकार समोर आला.

पोलीस आणि कुटुंबीय त्याचा शोध घेत होते - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण देवासी या आठ वर्षीय मुलाची अज्ञात व्यक्तीने डोक्यात फारशी घालून खून केलाय. या प्रकरणी चिखली पोलीस अज्ञाताचा शोध घेत आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास लक्ष्मण घरातून बेपत्ता झाला होता. कुटुंबियांना त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु, तो सापडला नाही. अखेर चिखली पोलिसात लक्ष्मण बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलीस आणि कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. रविवारी रात्री उशिरा लक्ष्मणचा मृतदेह घराजवळ काही मीटर अंतरावर सापडला आहे. अद्याप, लक्ष्मणचा मारेकरी सापडला नाही. या घटनेचा अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.

हेही वाचा - Aarey Colony violence : मुंबईतील आरे कॉलनीत दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.