पुणे - दक्षिण काश्मीरमधील अमरनाथ गुंफेच्या ( Amarnath Caves ) पायथ्याशी असलेल्या यात्रातळानजीक शुक्रवारी ढगफुटी ( Amarnath Cloudburst ) झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यात १५ जणांचा मृत्यूू झाला असून ४० जण बेपत्ता आहे. अमरनाथ यात्रेसाठी ( Amarnath Yatra ) पुणे जिल्ह्यातील 50 भाविक यात्रेसाठी गेले होते. यातील पुण्यातील धायरी येथील सुनिता महेश भोसले यांचा या दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी दिली आहे.
8 जण बेपत्ता - पुणे जिल्ह्यातील 50 हून अधिक यात्रेकरू हे अमरनाथ येथे पिंपरी वरून गेले होते. यातील 8 जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 50 जणांच्या पैकी 42 लोकांशी संपर्क झाला असून 8 जणांशी अजूनही संपर्क नाही. धायरी येथील महेश भोसले, सुनिता महेश भोसले, प्रमिला प्रकाश शिंदे हे तिघे अमरनाथ यात्रेसाठी गेले होते. यात सुनिता महेश भोसले यांचा मृत्यू झाला आहे. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भोसले कुटुंबीयांना भेट देत सांत्वन केले आहे.
दरम्यान, दक्षिण काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहेच्या पायथ्याशी असलेल्या यात्रा तळानजीक शुक्रवारी ढगफुटी झाल्याचे अधिकाऱ्यांनी ( Amarnath Yatra Cloudburst ) सांगितले. यात १६ जणांचा मृत्यूू झाला असून ४० जण बेपत्ता आहेत. या बेपत्ता भाविकांमध्ये पुण्यातील आठ भाविकांचा समावेश असल्याचे समोर आले ( Pune Devotees go missing in Amarnath ) आहे.अमरनाथ गुंफेच्या परिसरात काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही ढगफुटी झाली. प्रचंड पावसात या तळावरील काही तंबू, प्रसादालयांचे नुकसान झाले असून, तेथे बचाव मदतकार्य सुरू आहे.
अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित : भारतीय लष्करही घटनास्थळी बचावकार्य करत आहे. जखमींना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी आणि रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सोनमर्ग येथील बालटाल बेस कॅम्प येथून अमरनाथ यात्रा ( amarnath yatra ) तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. आज आम्हाला येथे तंबूत राहण्यास सांगण्यात आल्याचे एका भक्ताने सांगितले. तेथील हवामान अजूनही खराब आहे. प्रशासनासोबतच एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्याही मदतकार्यात गुंतल्या आहेत. पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी एलजी मनोज सिन्हा यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली आहे.
रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू - हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. काही काळासाठी प्रवास थांबवण्यात आला आहे. हवामान खात्याचा अहवाल, इतर परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. निलागर हेलिपॅडवर वैद्यकीय पथके उपस्थित आहेत. माउंटन रेस्क्यू टीम आणि इतर टीम बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. परिस्थिती नियंत्रणात असून, अनेकांची सुटका करण्यात आल्याचा दावा बचावकार्यात सहभागी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केला आहे. बचावकार्य लवकरच पूर्ण होईल, असेही सुरक्षा दलांचे म्हणणे आहे. बचाव कार्यात शोध आणि बचाव कुत्रे देखील तैनात करण्यात आले आहेत. शरीफाबाद येथील दोन शोध आणि बचाव कुत्र्यांना हेलिकॉप्टरने पवित्र गुहेत नेण्यात आले आहे.
हेही वाचा - Kedarnath Yatra Stop : उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर; अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने केदारनाथ यात्रा थांबवली