पुणे : राज्यातील निवासी डॉक्टरांनी आजपासून राज्यातील सरकारी रुग्णालये आणि कॉलेजेसमधील ओपीडी, नॉन इमर्जन्सी वॉर्ड आणि निवडक सेवा न देण्याचा इशारा दिला आहे. त्या पाश्वभूमीवर पुण्यातील मूळ निवासी डॉक्टरांनी ससून रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन ( Protest outside Sassoon Hospital ) केले आहे. आंदोलनातील मागण्या मान्य न झाल्यास हा संप असाच सुरू राहणार आहे, असा इशारा या डॉक्टरांनी दिला आहे.
महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर -
महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर ( Maharashtra Resident doctors indefinite strike ) गेले आहेत. राज्यात एकीकडे दिवसंदिवस कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनचा संसर्ग देखील वाढत चालला आहे. त्या पश्वभूमीवर राज्यात अश्या पद्धतीने मूळ निवासी डॉक्टरांच्या संपावर जाण्याने रुग्णसेवाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे. नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भातली तारीख जाहीर होत नाही, तोपर्यंत संप सुरुच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.
कमी मनुष्यबळामुळे डॉक्टरांवर येतोय ताण -
गेल्या एक वर्षांपासून आम्ही कमी लोकांमध्ये काम करत आहोत. तसेच आत्ता येत्या 2 महिन्यात आमचे जे सिनियर डॉक्टर आहेत. ते देखील बाहेर पडतील. त्यानंतर अजून मोठ्या प्रमाणात ताण आमच्यावर येईल. त्यामुळे आम्हाला लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून रुग्णांना होणारा त्रास कमी होईल. ही आमची प्रमुख मागणी आहे. तसेच दिल्ली येथे डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा देखील आम्ही निषेध करतो. असं देखील यावेळी आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा - Pune Crime News : एका पेनच्या मदतीने पुणे पोलिसांनी लावला 29 लाखांच्या चोरीचा छडा, वाचा ते कसे..!