पुणे : किरीट सोमैयांनी डर्टी डझन यादी जाहीर केली आहे. त्यात अजित पवारांचे नाव असून, ते लवकरच तुरुंगात जातील, म्हटले होते. त्यावर मग काय तुरुंगात जाऊ का?. मी विकास कामाला महत्व देत असतो. जे काही कायद्याने, नियमाने असेल ते प्रत्येकाच्या बाबतीत घडेल, अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar Angry ) यांनी दिली. ते पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना बोलत ( Ajit Pawar In Pune ) होते.
किरीट सोमैयांनी डर्टी डझन यादी जाहीर केली आहे. त्यात तुमचे नाव आहे. अजित पवार लवकरच तुरुंगात जातील, असे म्हटल्याचे पत्रकारांनी अजित पवारांना विचारले. त्यावर मग काय तुरुंगात जाऊ ( Ajit Pawar On Kirit Somaiya ) का?. नो कमेंन्ट्स, तुम्हाला कितीदा सांगत असतो की, मी विकास कामाला महत्व देत असतो. जे काही कायद्याने, नियमाने असेल ते प्रत्येकाच्या बाबतीत घडते. जेव्हा मोदी साहेब इथे आले, तेव्हा त्यांनी देशांमध्ये विकासाच्या मुद्यावर लोकांच मन जिंकले. ही फॅक्ट असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले.
1 मार्च पासून जम्बो बंद
राज्यासह जिल्ह्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणात असून, पुणे आणि पिंपरी शहरातील जम्बो हॉस्पिटल हे 1 मार्चपासून बंद होणार आहे. टास्क फोर्स अन् डॉक्टर यांच्याशी बोलून आणि सध्याची रुग्णसंख्या पाहता जम्बो रुग्णालयाची आता गरज वाटत नाही. म्हणून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, सर्व नियमांचे पालन करत पूर्व प्राथमिक शाळा 2 मार्चपासून सुरू होणार आहे. पालकांना वाटत असेल तर त्यांनी मुलं शाळेत पाठवावी, असेही आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.
चर्चेतून मार्ग निघेल
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन संभाजीराजे छत्रपती हे आजपासून उपोषणाला बसले आहेत. त्यावर बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या प्रकरणावर एक बैठक घेतली. संभाजीराजे बाहेर असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, चर्चेतून मार्ग निघतो, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - Balasaheb Thorat On Sambhajiraje : संभाजीराजेंचे समाधान करण्याचा प्रयत्न करु, बाळासाहेब थोरात