पुणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर येत असून शहरात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता विधान भवन येथे पाऊस, अतिवृष्टी पीक पाणी व विकास कामे याबाबत आढावा बैठकीला सुरवात झाली आहे. या बैठकीला राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि बारामतीचे आमदार अजित पवार हे या बैठकीला अनुपस्थित असल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी उपस्थित आहे. या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार तानाजी सांवत, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, भाजप आमदार भीमराव तापकीर आदी उपस्थित आहेत. पण आजच्या बैठकीला अजित पवार आणि शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चेला उधाण आल आहे.
सरकारने बसून घोषणा करू नये, एकाही शेतकऱ्याला तातडीचा पंचनामा नाही- बळीराजाचे नक्की दुखणे काय हे समजून घेतले पाहिजे. सरकाने बसून घोषणा करू नये, एकाही शेतकऱ्याला तातडीची मदत नाही. पंचनामा देण्यात आली नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar visit ) यांनी केली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेतकऱ्याला आणि सामान्य नागरिकाला तातडीने मदतीची गरज असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दौरा करून पंधरा दिवस उलटून गेले तरी अद्याप मदत दिली गेलेली नाही.
प्रश्न अधिवेशनात लावून धरु असा इशारा-माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Former Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी मुलाखत द्यायची आणि त्यानंतर त्यांच्यावर वक्तव्य करत हल्ला चढवायचा, यातून राज्याचे प्रश्न सुटणार नाही. तसेच राज्यात 10 लाख हेक्टर शेत पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना जी भरीव मदत मिळायला पाहिजे होती, ती अद्याप मिळाली नसल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar ) यांनी केले आहे. शेतकऱ्याच्या ( farmer ) बांधावर जाणून घेऊन प्रश्न अधिवेशनात लावून धरु असा इशारा राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिला आहे.
हेही वाचा - Chawl culture : मुंबईची ओळख जपणारी चाळ संस्कृती, सुमारे 20 हजार चाळी पुनर्विकासाच्या कचाट्यात