ETV Bharat / city

पुणे शहरात दहा रुपयात वातानुकूलित प्रवास, महापालिकेकडून पुण्यदशम् सेवा सुरू - air-conditioned-travel-in-pune-city-for-ten-rupees

शहराच्या मध्यवर्ती भागात वातानुकूलित बसमधून आता दहा रुपयांमध्ये प्रवास करता येणार आहे. महापालिकेच्या वतीने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आजपासून आकर्षक अशा गुलाबी रंगाच्या 50 बस पुण्यातील मध्यवर्ती भागात आणि पेठांमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत.

महापालिकेकडून पुण्यदशम् सेवा सुरू
महापालिकेकडून पुण्यदशम् सेवा सुरू
author img

By

Published : Jul 9, 2021, 3:58 PM IST

पुणे - शहराच्या मध्यवर्ती भागात वातानुकूलित बसमधून आता दहा रुपयांमध्ये प्रवास करता येणार आहे. महापालिकेच्या वतीने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आजपासून आकर्षक अशा गुलाबी रंगाच्या 50 बस पुण्यातील मध्यवर्ती भागात आणि पेठांमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. अशी पुणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात गुलाबी रंगाच्या 50 मिडी बसेस पुण्यातील मध्यवर्ती भाग आणि पेठांमध्ये प्रवास करणार आहेत.

पुणे शहरात दहा रुपयात वातानुकूलित प्रवास. त्याबाबतची महापालिकेकडून पुण्यदशम् सेवा सुरू करण्यात आली आहे. त्याचा इटीव्ही भारतने आढावा घेतला आहे

डिसेंबरमध्ये 300 बस उपलब्ध होणार

डिसेंबरमध्ये 300 बस उपलब्ध होणार असून या बसचा संपूर्ण शहरात सहा विभागांमध्ये विस्तार होणार आहे. या योजनेत तिकिटाचा दर दहा रुपये इतका आहे. एका तिकिटावर दिवसभरात कितीही वेळा प्रवास करता येणार आहे. तसेच, हा संपूर्ण प्रवास वातानुकूलित असणार आहे. या बसची आसन क्षमता 24 इतकी असणार आहे. मिडी आकारामुळे अरुंद रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. सीएनजी या नैसर्गिक इंधनावर ही बस धावणार आहे. मुख्य रस्त्यांवर दर पाच तर अंतर्गत रस्त्यांवर दर पंधरा मिनिटाला बस उपलब्ध होणार आहे.

वाहतूक कोंडी कमी होण्यास या बसची मदत

या सेवेत डेक्कन ते पुलगेट, स्वारगेट ते पुणे स्टेशन, स्वारगेट ते शिवाजीनगर या मार्गाच्या दरम्यान येणाऱ्या सर्व पेठा आणि मध्यवर्ती भाग असा असणार आहे. वाहतूक कोंडी कमी होण्यास या बसची मदत होणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष या नात्याने सन (2020 - 21) चा अर्थसंकल्प मांडताना ही योजना सादर केली होती. तिची मंजुरीची प्रक्रिया नुकतीच पूर्णं झाली आहे. आजपासून ही योजना सुरू करण्यात येत आहे. याचा खूप आनंद आहे. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. शहरातील मध्यवर्ती भागात तर वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात होत असते. या योजनेत बसेस हे मिडी आकाराच्या असल्याने अरुंद रस्त्यांवर तसेच पेठांमध्ये वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. स्वस्त, गतिमान, आरामदायी, वेळेची बचत करणारा, सुरक्षित प्रवास अस या योजनेच वैशिष्ट्य आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.