ETV Bharat / city

पुण्यात धक्कादायक प्रकार..! धमकी देत छायाचित्र प्रदर्शन बंद पाडले

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कला दालनात अक्षय माळी या तरुणाने न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवल्याने त्याला आंदोलनाची धमकी आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

agitation threat to Akshay Mali
न्यूड फोटोग्राफी अक्षय माळी
author img

By

Published : Jan 10, 2022, 7:17 PM IST

पुणे - पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कला दालनात अक्षय माळी या तरुणाने न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवल्याने त्याला आंदोलनाची धमकी आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

माहिती देताना अक्षय माळी

हेही वाचा - Avinash Bhondwe On Omicron Subtype : बीए-1, बीए-2 आणि बीए-3 हे ओमायक्रॉनचेच प्रकार - डॉ. अविनाश भोंडवे

बालगंधर्व व्यवस्थापनानेही हा सर्व प्रकार पाहता त्याचे प्रदर्शन अचानक बंद केले आहे. बालगंधर्व कला दालनात 7 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान प्रदर्शन भरविण्यात आले होते. मात्र, पहिल्या दिवशी प्रदर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धमकी आल्याने प्रदर्शन बंद झाले.

धमकी देत प्रदर्शन पाडले बंद

अक्षय माळी हा मूळचा साताऱ्याचा आहे. त्याने पुण्यातील सिम्बायोसिस स्कुल ऑफ फोटोग्राफीमधून शिक्षण घेतले आहे. पुण्यात आतापर्यंत न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन कधी झाले नाही. समाजाचा न्यूड फोटोग्राफी अथवा चित्रकला याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी अक्षयने ही नवीन संकल्पना आणली होती. मात्र, यावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या काहींनी आंदोलनाची धमकी देत हे प्रदर्शन बंद पाडल्याचे अक्षयने सांगितले आहे.

कोणी कितीही टीका केली तरी माझी कला बंद करणार नाही

सात जानेवारीला मी हे न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवले होते. पहिल्याच दिवशी अतिशय चांगल्या प्रकारे प्रदर्शनाला प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या दिवशी एका अज्ञात नंबरवरून मला फोन आला. ''हे असलं प्रदर्शन दोन मिनिटांत बंद करा, अन्यथा आंदोलन केले जाईल'' अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर बालगंधर्व व्यवस्थापनानेसुद्धा दुसऱ्या दिवशीपासून नागरिकांना प्रदर्शन पाहण्यासाठी सोडले नाही. आता सध्या मी लावलेली सर्व चित्रे उलटी करून ठेवण्यात आली आहेत. कोणी प्रदर्शन पाहायला आले तर ते हास्यास्पद दिसत आहे. मी याबद्दल कुठेही तक्रार करणार नाही. आज शेवटचा दिवस थांबून सायंकाळी प्रदर्शन काढणार असल्याचे अक्षयने यावेळी सांगितले.

फोटोग्राफीबद्दल माझ्या मनात जे नवे विचार, कल्पना येतात, त्या मी फोटोग्राफीसारख्या कलेतून मांडण्याचा प्रयत्न करत असतो. कोणी कितीही टीका केली अथवा धमकी दिली तरी माझी कला बंद करणार नाही. आणि धमक्यांना उत्तरे द्यायला माझ्याकडे वेळ नाही, असेही अक्षय म्हणाला.

हेही वाचा - Booster Dose Started In Pune : पुण्यात बुस्टर डोसला सुरवात, 'ईटीव्ही भारत'कडून खास आढावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.