ETV Bharat / city

ईडीकडून अटक होईल अशी भीती घेऊन जगण्याची एकनाथ खडसेंवर वेळ - अ‍ॅड. असीम सरोदे - Girish Chaudhary arrest ed

ईडीकडून अटक होईल अशी भीती घेऊन जगण्याची एकनाथ खडसेंवर वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दिली. २०१७ मध्ये पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ईडीकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यावर अ‍ॅड. असीम सरोदे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

advocate Asim Sarode
अ‍ॅड. असीम सरोदे
author img

By

Published : Jul 7, 2021, 7:27 PM IST

Updated : Jul 7, 2021, 7:45 PM IST

पुणे - ईडीकडून अटक होईल अशी भीती घेऊन जगण्याची एकनाथ खडसेंवर वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दिली. २०१७ मध्ये पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ईडीकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यावर अ‍ॅड. असीम सरोदे यांनी ही प्रतिक्रिया दिली. मध्यंतरी भोसरी जमीन प्रकरणी अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दोन हजार पानांची माहिती ईडीकडे दिली होती.

माहिती देताना अ‍ॅड. असीम सरोदे

हेही वाचा - भोंदूबाबासोबतच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीकडून खून, पिंपरी चिंचवड परिसरातील घटना

एकनाथ खडसे यांना अटक होण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मोठा धक्का दिला आहे. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी गिरीश चौधरी यांना ईडीकडून सोमवारी सकाळी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. ज्या पद्धतीने ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे, त्यावरून आता एकनाथ खडसे यांना आणि त्यांच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते आणि त्यांनतर अटक होण्याची शक्यता वाढली आहे, असे मत अ‍ॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले.

काय आहे प्रकरण?

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमुल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी, की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचे समोर आले होते.

हेही वाचा - रविराज तावरे गोळीबार प्रकरणात माळेगावच्या माजी सरपंचाला अटक

Last Updated : Jul 7, 2021, 7:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.