ETV Bharat / city

Pune Burglary Revealed : पुण्यात 'या' भागात घरफोड्या करणारे आरोपी जेरबंद.. ७ घरफोड्या उघडकीस, दोघे अटकेत

author img

By

Published : Feb 18, 2022, 3:12 PM IST

पुण्यातील हडपसर भागात घरफोड्या करणाऱ्या २ आरोपींना हडपसर पोलिसांनी जेरबंद केले ( Two Arrested In Burglary Case In Pune ) आहे. या दोघांकडून आतापर्यंत ७ घरफोड्या उघडकीस आल्या ( Pune Police Revealed 7 Burglary ) आहेत. तसेच ७ लाख रुपयांचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहेत.

पुण्यात 'या' भागात घरफोड्या करणारे आरोपी जेरबंद.. ७ घरफोड्या उघडकीस, दोघे अटकेत

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात वाढत असणाऱ्या घरफोड्या कक्षात घेता हडपसर पोलीस अधिकच सक्रीय झालेले पाहायला मिळत आहेत. काल एका दिवसात हडपसर पोलीसांनी ७ घरफोड्या उघडकीस आणत ( Pune Police Revealed 7 Burglary ) दोन गुन्हेगारांना देखील अटक केली ( Two Arrested In Burglary Case In Pune ) आहे. ज्यामधून पोलीसांनी जवळपास १३ लाख रुपयांचे सोने- चांदी असा चोरीचा ऐवज जप्त केला आहे.

काय आहे प्रकरण

याबाबत अधिक माहिती अशी की, एका चोरी प्रकरणातील फिर्यादी अनिलकुमार बेंदालम हे १० फेब्रुवारी रोजी दुपारी आपल्या राहत्या घरी लॉक करून बालाजी दर्शनासाठी गेले होते. मात्र ज्यावेळेस ते परतले त्यांना आपल्या घरी चोरी झाल्याचं समजल. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

आरोपी अटकेत

त्यानुसार या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी काल आरोपी अर्जुन अशोक पाटील याला अटक केली. त्यानंतर त्याची चौकशी करत असताना त्याने त्याचा साथीदार आणि या गुन्ह्यातील दुसरा आरोपी आकाश लशकरे याच्यासह हडपसर भागात अनेक घरफोड्या केल्याचं उघडकीस आलं आहे. पोलीसांनी या दोन्ही आरोपींकडून ७ लाख १५ हजरांचे १६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली आहे.

'या' घरफोडीतील आरोपी देखील अटकेत

तर दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपीला देखील पकडण्यात हडपसर पोलिसांना यश आलं आहे. हडपसरच्या केतकेश्वर कॉलनी येथे ३ ऑगस्ट रोजी देखील एका घरफोडी झाली होती. ज्यात १२० ग्रॅम वजनाचे ६ लाख ५०० रुपयांचे दागिने चोरीला गेले होते. यात आरोपी असलेल्या विजय सुभाष देशमाने या आरोपीला देखील पकडण्यात आल आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.