पुणे - प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पीए बोलत असल्याचे सांगून 25 लाखांची खंडणी मागणारी टोळी निगडी पोलिसांनी जेरबंद केली आहे. या आरोपींनी माजी आमदारांचा पीए असल्याचे सांगून अनेकांकडून पैसे उकळल्याचेही समोर आले आहे. खंडणी मागण्यासाठी आरोपी हे चोरी केलेले सीमकार्ड वापरत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सौरभ संतोष अस्टूळ (वय, 21 रा. लोहियानगर गंज पेठ, पुणे) मुख्य सूत्रधार विशाल अरुण शेंडगे आणि किरण धन्यकुमार शिंदे या तिघांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयातील डॉक्टरला आरोपींनी फोन करून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पीए बोलत आहे. कोरोना महामारीमुळे गरिबांची परिस्थती बिकट झाली असून, त्यांच्या मदतीसाठी तत्काळ 25 लाख पुण्यातील पर्वती येथील कार्यकर्त्यांकडे द्या, असे म्हणत पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी संबंधित डॉक्टरला देण्यात आली होती. याप्रकरणी धमकी मिळालेल्या डॉक्टरने चौकशी केली असता त्याने इतरांनांही खंडणीसाठी फोन केल्याचं उघड झाले. याप्रकरणी त्यांनी तातडीने निगडी पोलिसात जाऊन तक्रार नोंदवली.
निगडी पोलिसांनी एक पथक तयार करत तांत्रिक तपासाची चक्रे फिरवली. तेव्हा, पुण्यातील नारळ विक्रेत्याचा फोन नंबर असल्याचे समोर आले. निगडी पोलिसांनी चौकशी केली असता 2 ग्राहकांनी नारळ पार्सल घेण्यासाठी आले होते. त्यावेळी एकाने कॉल करण्यासाठी फोन मागितला होता तो काही मिनिटांनी परत केला होता. मात्र, त्यातील त्यांनी सिमकार्ड काढून घेतले होते. ते दुसऱ्या दिवशी समजले असे त्याने निगडी पोलिसांना सांगितले. तेव्हाच, त्याच नंबरवरून आरोपींनी पुण्यातील पाच व्यवसायिकांना फोन केला होता. पैकी एकाला विश्वासात घेऊन आरोपींना पैसे देऊ असे सांगण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे, पोलीस कर्मचारी किशोर पंढेर, सतीश ढोले भुपेंद्र चौधरी यांनी सापळा लावून आरोपीला पैसे घेऊन येत असल्याचे सांगितले. पुण्यातील अलंकार चौकात बोलवले असता, आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. आरोपीविरुद्ध पुण्यातील कोंढवा, कोथरूड, समर्थनगर, पौड पोलीस ठाण्यात माजी आमदार बाबर, निम्हण यांचे नाव घेऊन पैसे मागितल्याचे खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे, पोलीस कर्मचारी किशोर पढेर यांच्यासह अन्य पोलिसांनी केली.
चंद्रकांत पाटलांचा पीए असल्याचे सांगून मागितली 25 लाखांची खंडणी, आरोपी जेरबंद - पुण्यात खंडणी मागणाऱ्याला अटक
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पीए बोलत असल्याचे सांगून 25 लाखांची खंडणी मागणारी टोळी निगडी पोलिसांनी जेरबंद केली आहे. या आरोपींनी माजी आमदारांचा पीए असल्याचे सांगून अनेकांकडून पैसे उकळल्याचेही समोर आले आहे.