ETV Bharat / city

कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलाचा खून करून आबिद शेखची आत्महत्या, पोलिसांचा आंदाज - अबिद शेख प्रकरण न्यूज अपडेट

पुण्यातील आलिया शेख (वय 37) आणि आयान शेख (वय 7) यांचे मृतदेह सापडल्यानंतर बेपत्ता असणार्‍या आबिद शेख (वय 38) याचादेखील मृतदेह पोलिसांना आज सकाळी सापडला. एकापाठोपाठ एक तिघांचे मृतदेह सापडल्याने या प्रकरणाचं गूढ वाढलं असलं, तरी आबिद शेख यानेच कौटुंबिक कारणावरून पत्नी आणि मुलाचा खून करून आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.

कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलाचा खून करून आबिद शेखची आत्महत्या, पोलिसांचा आंदाज

author img

By

Published : Jun 18, 2021, 7:31 PM IST

पुणे - पुण्यातील आलिया शेख (वय 37) आणि आयान शेख (वय 7) यांचे मृतदेह सापडल्यानंतर बेपत्ता असणार्‍या आबिद शेख (वय 38) याचादेखील मृतदेह पोलिसांना आज सकाळी सापडला. एकापाठोपाठ एक तिघांचे मृतदेह सापडल्याने या प्रकरणाचं गूढ वाढलं असलं, तरी आबिद शेख यानेच कौटुंबिक कारणावरून पत्नी आणि मुलाचा खून करून आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी सासवड, भारती विद्यापीठ आणि हवेली अशा तीन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून, पोलीस तपास करत आहेत.

आज सकाळी खानापूर गावाजवळ असणाऱ्या नदीमध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या स्थानिक मच्छिमारांना मृतदेह दिसला होता. ही माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता हा मृतदेह आबिद शेख याचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना घटनास्थळावरून एक बॅग सापडली असून, यामध्ये आलीया शेख यांचे आधार कार्ड सापडले आहे.

आत्महत्या केल्याचा संशय

पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे मध्य प्रदेशातील भोपाळ येथील असणारे शेख कुटुंबीय 2011 मध्ये पुण्यात आले होते. त्यातील आबिद हा पुण्यातील नामांकित कंपनीत काम करत होता. तर आलिया या घरीच होत्या. त्यांचा मुलगा आयान हा गतिमंद होता. मुलाचा सांभाळ करण्यावरून त्यांच्यात कौटुंबिक वाद होते. या वादातूनच आबिद शेख याने आधी पत्नीचा आणि नंतर मुलाचा खून करून, अपराधीपणाच्या भावनेतून आत्महत्या केली असावी असा संशय असल्याची माहिती सागर पाटील यांनी दिली.

कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलाचा खून करून आबिद शेखची आत्महत्या, पोलिसांचा आंदाज

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आबित शेख झाला कैद

आलिया आणि आयान यांचे मृतदेह सापडल्यानंतर तपासादरम्यान पोलिसांना पुणे सातारा रस्त्यावर एक चारचाकी गाडी सापडली होती. हीच गाडी आबिद शेख याने पिकनिकला जाण्यासाठी भाड्याने घेतली होती. पोलिसांना या गाडीत लोखंडी रॉड सापडला होता. याच रॉडने मारहाण करून आबिदने पत्नी आणि मुलाचा खून केला असावा असा संशय आहे. तपासादरम्यान एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आबिद शेख कैद झाल्याचे दिसले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर संशयित म्हणून खुनाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान अबिद शेख याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याचा अहवाल आल्यानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणातील सत्य बाहेर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा - चालत्‍या दुचाकीवर झाड कोसळल्याने आजी-नातू जागीच ठ‍ार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.