ETV Bharat / city

'आज गडी लय जोरात' उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बंधू राजेंद्र पवार यांना कोपरखळी - 'Aaj Gadi Lay Jorat' Deputy Chief Minister Ajit Pawar's teak to brother Rajendra Pawar

आमचे बंधू आज लय जोरात होते. एखाद्याकडून काम करून घ्यायचे असेल तर त्याला उभा आडवा न करता काम गोडीगुलाबीने करून घेतले पाहिजे. मात्र त्यांच्या भाषणात सारखे चिमटे होते. जे काही काम असेल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. जास्त काही बोलत नाही कारण आमचे ते मोठे बंधू आहेत, अशी कोपरखळी अजित पवार यांनी मारली.

'आज गडी लय जोरात' उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बंधू राजेंद्र पवार यांना कोपरखळी

author img

By

Published : Nov 2, 2021, 4:49 PM IST

बारामती : आमचे बंधू आज लय जोरात होते. एखाद्याकडून काम करून घ्यायचे असेल तर त्याला उभा आडवा न करता काम गोडीगुलाबीने करून घेतले पाहिजे. मात्र त्यांच्या भाषणात सारखे चिमटे होते. जे काही काम असेल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. जास्त काही बोलत नाही कारण आमचे ते मोठे बंधू आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऍग्रीकलचरल डेव्हलपमेन्ट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांना कोपरखळी मारली.

'आज गडी लय जोरात' उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बंधू राजेंद्र पवार यांना कोपरखळी
बारामती येथे अटल इनोव्हेशन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. तत्पूर्वी आपल्या प्रास्ताविकामध्ये संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी कृषी महाविद्यालय व कृषी शिक्षणातील काही अडचणींबाबत आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पाच बैठका झाल्या मात्र कोणताही निर्णय झाला नाही अशी तक्रार केली. हाच धागा पकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेंद्र पवार यांना 'आज गडी लय जोरात आहे' अशा शब्दात कोपरखळी मारली. अजित पवार यांच्या वक्तव्यवर सभागृहात चांगलीच खसखस पिकली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार व्यासपीठावर उपस्थित होते.यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात हाच धागा पकडत अजितदादा आणि राजेंद्र पवार यांनी तुम्ही दोघांनी आधी ठरवा आणि मग माझ्याकडे या. आपण ते काम करण्याचा प्रयत्न करू. दादांनी आडकाठी आणली तर आपण पवार साहेबांकडे जाऊन ते काम करू असे म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.