ETV Bharat / city

भीमाशंकर अभयारण्य परिसरातील ओढ्यात शेतकरी गेला वाहून; शोधकार्य सुरु.. - bhimashankar Sanctuary

सध्या भिमाशंकर परिसरात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात असुन ओढे-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. पूल पार करत असताना पुलाचा अंदाज न आल्यामुळे एक शेतकरी वाहुन गेला.

घोटवडी गावाच्या ओढ्यात शेतकरी गेला
author img

By

Published : Jul 12, 2019, 5:55 PM IST

पुणे - महाराष्ट्रामध्ये काही भागात मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी संतत धार सुरू आहे. अशातच भीमाशंकर अभयारण्य परिसरातील घोटवडी गावाच्या (ता. खेड) बाजुने वाहणाऱ्या ओढ्यात एक आदिवासी शेतकरी वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक नागरिक आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध सुरु आहे.

घोटवडी गावाच्या ओढ्यात शेतकरी गेला

सध्या भिमाशंकर परिसरात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात असुन ओढे-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. ओढ्यात वाहुन गेलेल्या व्यक्तीचे नाव बाळु भिका बांगर (35, घोटवडी) असून ते बांगवाडी वरुन घोटवडीकडे जात असताना वाटेत एक पूल लागला. मात्र, ओढा भरून वाहत असल्याने पुलही दिसेनासा झाला होता. पूल पार करत असताना पूलाचा अंदाज न आल्यामुळे तो वाहुन गेला.

"घोटवडी गावाजवळील ओढा पुढे जाऊन आरळा नदीला मिळतो आणि सध्याच्या पावसामुळे ओढा व नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे, या परिसरात शोधकार्य करताना मोठ्या अडचणी येत आहेत. खेड तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापनाची टिम घटनास्थळी दाखल झाली असुन बांगर यांचा शोध सुरु आहे." अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख नायब तहसीलदार राजेश कानसकर यांनी दिली.

Intro:Anc__भिमाशंकर अभारण्य परिसरातील घोटवडी गावाच्या बाजुने वाहणा-या ओढ्यात पडुन ३५ वर्षीय आदिवासी शेतकरी वाहुन गेल्याची धक्कादायक घटना आहे स्थानिक नागरिक व पोलीस पाटील यांच्या मदतीने वाहुन गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरु आहे बाळु भिका बांगर वय ३५ असे ओढ्याच्या पाण्यात वाहुन गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे

सध्या भिमाशंकर परिसरात पाऊसाचा जोर मोठ्या प्रमाणात असुन ओढे नाले दुथडी भरुन वाहत असताना बाळु बांगर हा आदिवासी शेतकरी बांगवाडी वरुन घोटवडीकडे जात असताना घोटवडी जवळील ओढ्याला पुलावरुन पाणी जात होते त्यातच पुराच्या पाण्यातुन पुल पार करत असताना पाण्यात पडुन वाहुन गेल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे

घोटवडी गावाजवळील ओढा हा पुढे जाऊन आरळा नदीला जाऊन मिळतो आणि सध्याच्या पाऊसामुळे ओढा व नदी दुथडी भरुन वाहत आहे त्यामुळे या परिसरात शोधकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत खेड तहसिल कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापनाची टिम घटनास्थळी दाखल झाली असुन बांगर यांचा शोध सुरु असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख नायब तहसिलदार राजेश कानसकर यांनी दिली.Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.