ETV Bharat / city

Samant Attack Case : माजी मंत्री उदय सामंत हल्ला प्रकरणी 18 ते 20 जणांवर गुन्हा दाखल - Udaya Samant

शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत ( Udaya Samant ) यांच्यावर काल पुण्यातील कात्रज चौकात झालेल्या हल्ल्याप्रकरणी (Uday Samant vehicle attack case ) शिवसेनाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे 10 आरोपींची नाव एफआरआय मध्ये असून या व्यतिरिक्त इतर 8 ते 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Samant Attack Case
सामंत हल्ला प्रकरणी 18 ते 20 जणांवर गुन्हा दाखल
author img

By

Published : Aug 3, 2022, 2:05 PM IST

पुणे - शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत ( Udaya Samant ) यांच्यावर काल पुण्यातील कात्रज चौकात झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेनाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे 10 आरोपींची नाव एफआरआय मध्ये असून या व्यतिरिक्त इतर 8 ते 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे असून या आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील तपास करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे ( Bharti Vidyapeeth Police Station ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर ( Police Inspector Jagannath Kalskar ) यांनी दिली.

सामंत हल्ला प्रकरणी 18 ते 20 जणांवर गुन्हा दाखल

शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची काल कात्रज चौकातील सभा झाल्यानंतर तेथून काही कार्यकर्ते जात होते. त्यावेळी शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांची कार कार्यकर्त्यांना दिसली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत, गाडीची काचदेखील फोडली.या प्रकरणी पोलिसांनी शिवसैनिकांनी अटक केली आहे.
या हल्ला प्रकरणी पुणे पोलिसांनी मुंबईत मोठी कारवाई करत शिवसेनेचे हिंगोली चे संपर्कप्रमुख बबन थोरात यांना ताब्यात घेतलं आहे. बबन थोरात हे शिवसेनेचे हिंगोली चे संपर्कप्रमुख आहे.बबन थोरात यांनी चितावणी कोर भाषण करत बंडखोर आमदारांच्या गाड्या फोडा अस वक्तव्य केल होत.या वक्तव्यानंतर पडसाद उमठायला सुरुवात झाल्याने पुणे पोलिसांनी मुंबईमधून बबन थोरात यांना ताब्यात घेतलं आहे.

या आधी - माजी मंत्री उदय सामंत हल्ला प्रकरणी शिवसेना शहर प्रमुखासह ( Pune Shiv sena president arrest ) 5 जणांना अटक करण्यात आले होते. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा कार्यक्रम आयोजित करणारे मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांनादेखील अटक करण्यात आले. शिवसेना शहरप्रमुख पुणे संजय मोरे ( Sanjay More arrest ) यांना उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा ( Uday Samant vehicle attack case ) प्रयत्न केल्याच्या आरोपावरून मध्यरात्री कोथरूड पोलीस स्टेशनकडून अटक करण्यात आली आहे.

पंधरा लोकावर गुन्हा दाखल - पुणे पोलिसांनी राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार यांना माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणी पंधरा लोकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, संभाजीराव थोरवे, राजेश पळसकर,सुरज लोखंडे,चंदन साळुंखे , विशाल धनवडे.अनिकेत घुले,रुपेश पवार , इतर शिवसेना पदाधिकारी यांच्या वर भारती विद्यापीठ स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना अटक केली आहे. शिवसैनिकांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हेही वाचा : उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुखासह सहा जणांना अटक, न्यायालयात करण्यात येणार हजर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.