ETV Bharat / city

Deccan Queen Pune : डेक्कन क्वीनचा 93 वा वाढदिवस उत्साहात साजरा, प्रवाशांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा

author img

By

Published : Jun 1, 2022, 9:35 AM IST

Updated : Jun 1, 2022, 12:55 PM IST

पुणे - मुंबईदरम्यान दररोज ( Birthday of Deccan Queen Celebrated in pune ) रेल्वेने ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली दख्खनची राणीने (डेक्कन क्वीन) आज 93 व्या वर्षात पदार्पण ( Deccan Queen news ) केले. रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा हर्षा शहा यांच्या माध्यमातून आज डेक्कन क्वीन चा 93 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Deccan Queen Birthday pune
डेक्कन क्वीन वाढदिवस पुणे

पुणे - पुणे - मुंबईदरम्यान दररोज ( Birthday of Deccan Queen Celebrated in pune ) रेल्वेने ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली दख्खनची राणीने (डेक्कन क्वीन) आज 93 व्या वर्षात पदार्पण ( Deccan Queen news ) केले. रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा हर्षा शहा यांच्या माध्यमातून आज डेक्कन क्वीन चा 93 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, डेक्कन क्वीनचे प्रवाशी, रेल्वे प्रशासन आदी लोक यावेळी उपस्थित होते.

माहिती देताना प्रवाशी

हेही वाचा - PMC Election Reservation 2022 : पुणे महापालिका निवडणूक आरक्षण सोडत जाहीर; 173 जागांपैकी 87 जागेवर 'महिला राज'

अशी सुरवात झाली - पुणे-मुंबई शहराला जोडण्यासाठी एक जून १९३० रोजी डेक्कन क्वीनची सेवा सुरू करण्यात आली. त्याला आता 92 वर्षे पूर्ण झाली आहेत. ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे कंपनीने पहिली 'लक्झरिअस सेवा' म्हणून पुणे-मुंबई मार्गावर डेक्कन क्वीनची सेवा सुरू केली होती. महाराजा एक्स्प्रेस, डेक्कन ओडिसी, 'पॅलेस ऑन व्हील्स' यांसारख्या महागड्या गाड्यांमध्ये असलेल्या अनोख्या 'डायनिंग कार'चा डेक्कन क्वीनमध्ये समावेश आहे. त्यामुळे डेक्कन क्वीनला इतर इंटरसिटी गाड्यांपेक्षा वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. दर वर्षी एक जूनला ही गाडी मुंबईला रवाना होण्यापूर्वी रेल्वे प्रवासी ग्रुप आणि पुणे ते मुंबई या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठ्या थाटात केक कापून वाढदिवस साजरा केला जातो.

अनेक प्रवाशांनी सांगितल्या जुन्या आठवणी - आज डेक्कन क्वीनचा वाढदिवस असून ही डेक्कन क्वीन आमच दुसरे घर असून, अनेक आठवणी या डेक्कन क्वीनशी निगडित आहे, अशा भावना यावेळी दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केल्या. डेक्कन क्वीनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शुभेच्छा दिल्या, असे विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सांगितले.

यंदा 68 वे वर्ष - रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांचे काका शांतिलाल शहा व्यवसायानिमित्त पुणे-मुंबई असा नियमित प्रवास करतात. त्यांनी १९५४ मध्ये पहिल्यांदा डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा केला होता. त्या वेळी हर्षा शहा पाच वर्षांच्या होत्या. तेव्हापासून दर वर्षी त्या डेक्कन क्वीनच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहे. काकांच्या पश्चात त्यांनी स्वत: वाढदिवस साजरा करण्याची परंपरा सुरू ठेवली. वाढदिवस साजरा करण्याचे हे 68 वे वर्षे आहे, अशी माहिती हर्षा शहा यांनी दिली.

हेही वाचा - Attacked by Minors : इंस्टाग्रामवर स्टेटस् ठेवल्याच्या रागातून अल्पवयीन टोळक्याचा मित्रावर खूनी हल्ला

Last Updated : Jun 1, 2022, 12:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.