पुणे - पुण्यातील 91 वर्षे वयाच्या वसंतराव पिसाळ या आजोबांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. शहरातील साई स्नेह कोविड सेंटरमध्ये हे आजोबा उपचार घेत होते. याशिवाय सुचेता केसरकर (वय 71) या ज्येष्ठ महिलेने देखील कोरोनावर मात केली आहे. या दोघांनाही आज (मंंगळवार) कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरा शिवाय हे दोघेही बरे झाले आहेत. कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. सुनील जगताप, डॉ. सुमीत जगताप, वॉर्डबॉय आणि परिचारिका यांनी टाळया वाजवत नातेवाईकांच्या उपस्थितीत आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
कोविड सेंटरचे डॉ. सुनील जगताप म्हणाले, ‘कोरोना साथीची परिस्थिती गंभीर आहे. रॉयल हॉटेलचे रुपांतर साई स्नेह कोविड सेंटर मध्ये करण्यात आले. 15 एप्रिलला हे सेंटर सुरु झाले. येथे 80 रुग्ण दाखल होऊ शकतात. 40 याऑक्सिजन बेडची सुविधा याठिकाणी उपलब्ध आहे. कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल झाल्यावर नातेवाईकांना एरवी नीट माहिती मिळत नाही. मात्र नातेवाईकांना रुग्णांच्या प्रगतीची माहिती देण्याची, समुपदेशनाची खास सुविधा आम्ही उपलब्ध करुन दिली आहे’.
कात्रज घाटात हे साई स्नेह कोविड सेंटर आहे. व्हेंटीलेटर बेड वगळता अन्य सर्व सुविधा येथे आहेत. 40 कोविड रुग्णांवर उपचाराची सुविधा येथे आहे. येथे उपचारासाठी दाखल झालेल्या आणि कोविड मधून बऱ्या झालेल्या इतर 6 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला.