ETV Bharat / city

पुणे : कोरोना रुग्णांसाठी खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड ताब्यात घेण्याचा निर्णय

author img

By

Published : Mar 29, 2021, 6:21 PM IST

शहरातील 20 मोठ्या खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी ताब्यात घेण्याचे आदेश महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यानुसार आता कोरोना रुग्णांसाठी आणखी 2 हजार बेड उपलब्ध होणार आहेत. पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना रुग्णांसाठी खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड ताब्यात घेण्याचा निर्णय

पुणे - शहरातील 20 मोठ्या खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी ताब्यात घेण्याचे आदेश महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यानुसार आता कोरोना रुग्णांसाठी आणखी 2 हजार बेड उपलब्ध होणार आहेत. पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी तब्बल 4 हजार 426 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली.

पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना बेड कमी पडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नागरिकांना उपलब्ध बेडची माहिती मिळावी, म्हणून महापालिकेच्या वतीने कोविड वॉर रूम सुरू करण्यात आले आहे. मात्र या वॉर रूममध्ये सर्वाधिक तक्रारी या बेड उपलब्ध नसल्याच्या येत आहेत. त्यामुळे शहरातील 20 मोठ्या साखगी रुग्णालयांमधील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी ताब्यात घेण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. सध्या पुण्यातल्या खासगी रुग्णालयातील साडेसात हजार बेड, कोविड केअरसाठी उपलब्ध केले जाऊ शकतात. त्यातले साडेचार हजार बेड यापूर्वीच कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आता त्यात आणखी 2 हजार बेडची भर पडणार आहे.

व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडच्या संख्येमध्ये वाढ

सोमवारी जम्बो कोविड सेंटरमध्ये 10 व्हेंटिलेटर बेड वाढवण्यात आले आहेत. तसेच आर्मी हॉस्पिटलसोबत बोलणी करून 30 व्हेंटिलेटर बेड वाढवले जातील अशी माहिती महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली. सोबतच भारती हॉस्पिटलचे 50 ऑक्सिजन बेड आणि 10 व्हेंटिलेटर बेड वाढवले असून, आज दिवसभरात 60 आयसीयू बेड वाढवण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.