ETV Bharat / city

पुणे विभागातील 6 हजार 981 कोरोनाबाधित रुग्ण बरे

6 जूनच्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 283 ने वाढ झाली आहे. यात पुणे जिल्ह्यात 199, सातारा जिल्ह्यात 19, सोलापूर जिल्ह्यात 50, सांगली जिल्ह्यात 9, कोल्हापूर जिल्ह्यात 6 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

Pune division corona update
पुणे विभाग कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 6, 2020, 7:15 PM IST

पुणे - विभागातील 6 हजार 981 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11 हजार 723 झाली आहे. तसेच ॲक्टीव्ह रुग्ण 4 हजार 203 आहेत. तर एकुण 539 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. तर 231 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत असेही त्यांनी सांगितले.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 9 हजार 115 कोरोनाबाधित आहेत. तर 5 हजार 637 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 3 हजार 77 आहे. तर एकूण 401 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 220 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

6 जूनच्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 283 ने वाढ झाली आहे. यात पुणे जिल्ह्यात 199, सातारा जिल्ह्यात 19, सोलापूर जिल्ह्यात 50, सांगली जिल्ह्यात 9, कोल्हापूर जिल्ह्यात 6 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील 618 कोरोनाबाधित आहेत. तर 260 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्णसंख्या 332 आहे. एकूण 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 194 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 586 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 507 आहे. तसेच एकूण 101 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची 137 वर पोहोचली आहे. तर 79 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 54 आहे. तसेच 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 659 वर पोहोचली आहे. तर असून 419 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यातील ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 233 आहे. तर 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 98 हजार 394 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 94 हजार 343 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. 4 हजार 51 नमून्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 82 हजार 461 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर 11 हजार 723 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.