पुणे पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर एनआयए आणि एटीएसच्या वतीने कारवाई करण्यात आली होती. त्यादृष्टीने सकाळी कोंढवा पोलिसांच्या वतीने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोंढवा येथील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया तसेच एसडीपीआय या संघटनेच्या 6 जणांना पहाटे कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोंढवा पोलिसांनी घेतल ताब्यात या प्रकरणी अब्दुल बनसाल माजी अध्यक्ष एसडीपीआय, ऐनुल मोमीन माजी जिल्हा अध्यक्ष पिएफआय, काशीफ शेख, स्टेट पिएफआय मेंबर, दिलावर सय्यद, उपाध्यक्ष एसडीपीआय, माझ शेख पीएफआय फिझिक शिक्षक, आणि मोहम्मद कैस PFI अध्यक्ष यांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन पुण्यासह राज्यभरात एनआयए आणि एटीएसकडून छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. याच्या निषेधार्थ पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांच्या वतीने केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजी दरम्यान पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावण्यात आल्याचा आरोप करण्यात येऊ लागला आहे. त्यामुळे हा मोर्चा आता वादामध्ये सापडलेला असल्याचे पहायला मिळत आहे.
पाकिस्तान जिंदाबाद नाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल या प्रकरणी पाकिस्तान जिंदाबाद नाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोंढवा येथील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया तसेच एसडीपीआय या संघटनेच्या 6 जणांना पहाटे कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर सीआरपीसी प्रमाणे आम्ही प्रतिबंधक कारवाई करत आहेत, अशी माहिती यावेळी कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली.