ETV Bharat / city

omicron patients - पुणे जिल्ह्यातील पाच वर्षीय मुलाला ओमायक्रॉनची लागण

राज्यात ओमायक्रॉनची संसर्ग वाढत असून आज 6 जण बाधित आढळून आले आहेत. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील एका पाच वर्षांच्या मुलाचा त्यात समावेश आहे, मात्र त्याच्यात कोणतेही लक्षणे आढळून आली नाहीत, असे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Dec 19, 2021, 10:10 PM IST

Updated : Dec 19, 2021, 10:49 PM IST

मुंबई - राज्यात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असून आज सहा जण बाधित आढळून आले आहेत. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील एका पाच वर्षांच्या मुलाचा त्यात समावेश आहे, मात्र त्याच्यात कोणतेही लक्षणे आढळून आली नाहीत, असे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. तर, कोरोनाचे देखील 902 रुग्ण सापडले असून, त्यातील 9 जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

हेही वाचा - Amit Shah Pune Visit : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आपमानाची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही - अमित शाह

राज्यावर ओमायक्रॉनचे संकट घोंघावत असून राष्ट्रीय विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, आतापर्यंत 54 रुग्ण सापडले असून आज दिवसभरात 6 नवीन रुग्णांचा यात समावेश आहे. मुंबईतील 4, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. मुंबई विमानतळावर सापडलेल्या चार रुग्णांपैकी 1 मुंबई, 2 कर्नाटक आणि 1 औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. दोघांनी टांझानिया आणि दोघांनी इंग्लंडमधून भारतात प्रवास केला आहे. दोन महिला व 2 दोन पुरुष या चौघांचेही लसीकरण पूर्ण झाले असून ते लक्षणेविरहित आहेत. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांना विलगीकरण कक्षात ठेवल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

निकटवर्तीय बाधित

पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे एका पाच वर्षांच्या मुलाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या प्रवाशाच्या संपर्कात आल्याने तो बाधित झाला आहे. मात्र, सध्या त्याच्यात कोणतीही लक्षणे नाहीत. तर, पिंपरी - चिंचवडमधील एक 46 वर्षीय रुग्ण असून, खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.

येथे सापडले ओमायक्रॉनचे रुग्ण

मुंबईत 22, पिंपरी - चिंचवड 11, पुणे ग्रामीण 7, पुणे मनपा 3, सातारा 3, कल्याण डोंबिवली 2, उस्मानाबाद 2, नागपूर, लातूर, वसई - विरार, बुलडाणा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे, आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या 54 झाली आहे. यापैकी 28 जणांची आरटीपीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे.

525 प्रवाशांची जनुकीय चाचणी

1 डिसेंबरपासून आजपर्यंत 1 लाख 28 हजार 518 प्रवासी मुंबई, नागपूर आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. एकूण 21 हजार 514 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. अती जोखमीच्या देशातील 64 आणि इतर देशांतील 19 अशा एकूण 83, तर आजपर्यंतच्या 664 प्रवाशांची जनुकीय चाचणी करण्यासाठी नमुने पाठवले आहेत. पैकी 75 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

7 हजार 68 रुग्ण अॅक्टिव्ह

राज्यात आज दिवसभरात 902 नवीन रुग्ण सापडले. कोरोनाग्रस्तांचा आकडा यामुळे 64 लाख 49 हजार 596 वर पोहचला आहे. तर, आज 767 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत 64 लाख 97 हजार 500 कोरोनाबाधित उपचारानंतर बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर 97.71 टक्के इतका आहे. तर, मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आज दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, कोरोनाबाधित रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 74 लाख 84 हजार 674 चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांपैकी 9.82 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 72 हजार 982 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, आतापर्यंत 7 हजार 68 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई महापालिका - 321
ठाणे - 12
ठाणे मनपा - 39
नवी मुंबई पालिका - 38
कल्याण डोबिवली पालिका - 14
पालघर - 53
वसई विरार पालिका - 21
नाशिक - 19
नाशिक पालिका - 20
अहमदनगर - 33
अहमदनगर पालिका - 4
पुणे - 83
पुणे पालिका - 82
पिंपरी चिंचवड पालिका - 45

हेही वाचा - Amit Shah on Ram Temple Issue : राम मंदिर, कलम 370 वरुन अमित शहांनी दिले विरोधकांना प्रतिउत्तर

Last Updated : Dec 19, 2021, 10:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.