पुणे- चाकण परिसरातून 20 कोटींचे 20 किलो मेफेड्रोन ड्रग्स पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले होते. या प्रकरणी गुजरात कनेक्शन समोर आले आहे. वडोदरा येथून तीन आणि मुंबईमधून तीन जणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी रांजणगाव येथून 132 किलो ड्रग्स, रायगडमधील महाड मधून 15 असे एकूण 147 किलो मेफेड्रोन ड्रग्स जप्त केले होते. तर, 85 लाख रोख रक्कम आणि 75 हजारांचे जमिनीचे कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. गुजरात येथून अटक करण्यात आलेले आरोपी हे केमिकल कंपनी सुरू करणार होते. त्यामध्ये आरोपी मेफेड्रोन बनवणार होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र, त्या अगोदरच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी एकूण वीस जणांना याप्रकरणी अटक केली आहे.
हेही वाचा-विम्याची रक्कम पदरात पाडून घेण्यासाठी पतीचा खून करणाऱ्या पत्नीला 9 वर्षानंतर अटक
आरोपींचा उधळला मनसुबा-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील ड्रग्स प्रकणाचे धागेदोरे हे गुजरातपर्यंत पोहचले आहेत. तेथून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील तिन्ही मुख्य आरोपी आहेत. यापैकी पलांडे आणि अफजल हे दोघे गुजरात येथे केमिकल कंपनी स्थापित करून त्यामध्ये मेफेड्रोन ड्रग्स बनवणार होते.
हेही वाचा-ड्रग्ज प्रकरण: अर्जुन रामपालची प्रेयसी होणार एनसीबीसमोर हजर
सापळा रचून आरोपींना गुजरातमधून केली अटक
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गुजरातमध्ये जाण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी गुजरात येथील वडोदरा येथे सापळा रचून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडून इतर व्यक्तीची नावे समोर येतात का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांच्या या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील, प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, प्रशांत महाले, सागर पानमंद, अंबरीश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गिरीष चामले यांचा सहभाग होता. त्याचबरोबर
पोलीस अंमलदार दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, स्वामिनाथ जाधव, सुनिल कानगुडे, सावन राठोड, निशांत काळे, अशिष बोटके, शकुर तांबोळी, संदिप पाटिल, अतुल लोखंडे, नागेश माळी, विठ्ठल सानप, शैलेश मगर, अशोक गारगोटे, प्रदिप गुट्ठे यांचा कारवाई करणाऱ्या पथकात समावेश होता.