ETV Bharat / city

पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलात ५५ % जागा रिक्त; नियमावली नगरविकास विभागात साडे तीन वर्षांपासून धूळखात - अग्निशमन दलातील जागा रिक्त

अग्नीशामक दलातील अधिकारी व कर्मचारी यांची भरती करण्यासाठी आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली अग्नीशमन सेवा संचालनालयाने मार्च २०१८ मध्ये तयार केली. ही नियमावली नगरविकास मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर केली होती. पण साडे तीन वर्षे उलटून गेली तरी या नियमावलीला मंजूरी मिळाली नाही. पुण्यातील अग्निशमन दलात जवळपास 55 टक्के जागा रिक्त आहेत.

55% vacancies in Pune Municipal Fire Brigade
पुणे महापालिका अग्निशमन दल
author img

By

Published : Nov 11, 2021, 2:44 AM IST

Updated : Nov 11, 2021, 4:14 AM IST

पुणे - नुकतेच घडलेल्या अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडानंतर अग्निसुरक्षा हा विषय ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आणि घडल्या तरी कमीतकमी हानी व्हावी यासाठी अग्निशमन दलात पुरेसे मनुष्यबळ असणे अपेक्षित आहे. मात्र पुणे शहराचा विस्तार आणि शहराची सुरक्षितता विचारात घेता अग्निशमन दलात जवळपास 55 टक्के जागा रिक्त असल्याने त्या तातडीने भरल्या जाव्यात अशी मागणी होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा विषय प्रलंबित असून कर्मचारी रिटायर्ड झाल्यानंतर अजूनच मनुष्यबळ कमी होत चालले आहे.

पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलात ५५ % जागा रिक्त

साडे तीन वर्षे उलटून गेली तरी या नियमावलीला मंजूरी नाही -

अग्नीशामक दलातील अधिकारी व कर्मचारी यांची भरती करण्यासाठी आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली अग्नीशमन सेवा संचालनालयाने मार्च २०१८ मध्ये तयार केली. ही नियमावली नगरविकास मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर केली होती. पण साडे तीन वर्षे उलटून गेली तरी या नियमावलीला मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे पुणे महापालिकेच्या अग्नीशामक दलातील भरती रखडली आहे.

पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलात 510 अग्निशमन कर्मचाऱ्यांची गरज -

पुणे शहरात वर्षभरात सिरम इन्स्टिट्यूट, फॅशन स्ट्रीट येथे मोठ्या आगीच्या घटना घडून गेल्या आहेत. पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलात 510 अग्निशमन कर्मचाऱ्यांची गरज आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास मंत्रालयात धूळखात पडून आहेत. याचा परिणाम म्हणजे पुणे महापालिकेच्या अग्नीशमन दलातील भरती रखडली आहे. आजमितीला पुणे अग्नीशमन दलातील मंजूर 910 पदांपैकी 527 पदे रिक्त आहेत.

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची भरती होणे गरजेचे -

इतक्या मोठ्या संख्येने पदे रिक्त असूनही कोविड काळात ही जीवावर बेतून हे कर्मचारी काम करत आहेत. मात्र अग्निशमन सेवेतील पदे दीर्घकाळ रिक्त ठेवण अडचणीच असल्याचे पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी सातत्याने नगरविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना कळवूनही मंत्रालयाकडून निर्णय घेतला जात नाही हे दुर्दैव आहे. नगरविकास मंत्रालय थेट मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येत असल्याने तातडीने हा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. राज्यातील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची भरती मोठ्या प्रमाणात होणे गरजेची आहे. अग्निशमन दलाच्या जवानांवरील कामाचा ताण कमी होऊ शकतो.

हेही वाचा - नगरमध्ये रुग्णालयाला आग; जाणून घ्या यापूर्वी कुठे कुठे घडल्या होत्या अशा घटना...

हेही वाचा - Fadnavis Vs Malik Allegations : 'बिगडे नवाब' म्हणणाऱ्या अमृता फडणवीसांना मलिकांच्या मुलीचं उत्तर; म्हणाली..

Last Updated : Nov 11, 2021, 4:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.