ETV Bharat / city

पुण्यातील वेश्यावस्तीत लसीकरण, 50 टक्के महिला कागदपत्राविना लसीपासून वंचित

author img

By

Published : Jul 8, 2021, 3:31 PM IST

Updated : Jul 8, 2021, 3:59 PM IST

बुधवार पेठ येथील देवदासी महिलांसाठी सिंहगर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज लसीकरणाचे आयोजन करण्यात आले. बुधवार पेठेतील या वस्तीत पाहिल्यांदाच लसीकरण होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या या महिलांना लस देण्यात आली.

विशेष बातमी
विशेष बातमी

पुणे - साहाब हमारे पास तो कागदपत्र नही है... आप ही कुछ करीये... असं म्हणत काही महिला लसीकरण केंद्रावरून परत गेले, तर काही अपेक्षेने काही काळ थांबून होते. पुण्यात सिंहगर्जना प्रतिष्ठान आणि पुणे महापालिकेच्यावतीने बुधवार पेठेतील देवदासी महिलांसाठी कोविड लसीकरण केंद्र शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्या महिलांकडे कागदपत्र आहे त्यांनाच लस देण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे 3500 लोकवस्ती असलेल्या या महिलांमध्ये फक्त 50 टक्केच महिलांकडे आपली ओळखपत्र आहे.

बुधवार पेठेतील 50 टक्के महिलांचे कागदपत्राविना लसीकरण नाही, प्रशासनाने मार्ग काढण्याची मागणी

सिंहगर्जना प्रतिष्ठानतर्फे लसीकरणाचे आयोजन
बुधवार पेठ येथील देवदासी महिलांसाठी सिंहगर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज लसीकरणाचे आयोजन करण्यात आले. बुधवार पेठेतील या वस्तीत पाहिल्यांदाच लसीकरण होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या या महिलांना लस देण्यात आली. जवळपास 200 हून अधिक महिलांना लस देण्यात येणार आहे. सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात महिलांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती. मोठ्या उत्साहाने या ठिकाणी या महिलांनी लस घेतली. सुरुवातीला जेव्हा लसीकरणाला सुरुवात झाली तेव्हा आम्ही लस घेण्यासाठी खूप घाबरत होतो पण मनातील शंका दूर झाली आणि आम्ही लस घेत आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी या महिलांनी दिली.

स्पेशल
लसीसाठी प्रतिक्षा यादित महिला.

फक्त 50 टक्केच महिलांकडे कागदपत्रे
बुधवार पेठेत राहणाऱ्या या महिलांची संख्या जवळपास 3500 हजार हून जास्त आहे. काही महिला कामानिमित्ताने येथे येतात तर काही जण इथेच राहतात. पण धक्कादायक बाब म्हणजे या महिलांमध्ये जवळपास 50 टक्के महिलांकडे आधारकार्ड, पॅनकार्डच नाही. लसीकरणासाठी याबाबी आवश्यक असल्याने यांचे लसीकरण करायचे कसे असा प्रश्न आमच्या समोर आहे. प्रशासनाने काहीतरी मार्ग काढावा आणि या महिलांचे लसीकरण करावे. कारण दिवसभरात वेगवेगळ्या लोकांना या महिला भेटत असतात आणि त्यामुळे कोरोना वाढू नये म्हणून या महिलांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. असे मत यावेळी सिंहगर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी व्यक्त केले.

स्पेशल
लस देताना कर्मचारी

बुधवार पेठेत पहिल्यांदाच लसीकरण
केंद्र सरकारच्यावतीने 16 जूनपासून लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला फ्रंटलाईन कर्मचारी त्यानंतर 45 पुढील वयोगटासाठी आणि त्यानंतर 18 वर्षापुढील नागरिकांसाठी लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरण सुरू होऊन सहा महिने झाले असले तरी लसीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या या महिलांचे आज लसीकरण होत आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या या वस्तीत हजारो महिला त्यांच्या व्यवसायानिमित्ताने दरोरोज वेगवेगळ्या लोकांना भेटत असतात. असे असतानाही या महिलांना लसीकरणासाठी वेळोवेळी प्रतीक्षा करावी लागत होती. ज्या महिलांकडे कागदपत्र आहे त्या महिलांचे लसीकरण आज होत आहे तेही फक्त 200 महिलांचे पण ज्यांच्याकडे काहीच नाही, अशा महिलांचे काय? शासन या महिलांसाठी काही करणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्पेशल
लस देताना कर्मचारी

हेही वाचा - दारुसाठी आईचा खून, मृतदेहाचे तुकडे करुन काढले काळीज, नराधम मुलाला फाशीची शिक्षा

Last Updated : Jul 8, 2021, 3:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.