पुणे - विभागातील 5 लाख 91 हजार 731 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 लाख 21 हजार 268 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 166 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकूण 16 हजार 371 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.64 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.25 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा -
पुणे जिल्हयातील कोरोनाबाधित एकूण 4 लाख 10 हजार 129 रुग्णांपैकी 3 लाख 90 हजार 473 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 490 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 166 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.23 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.21 टक्के आहे.
सातारा जिल्हा -
सातारा जिल्हयातील कोरोनाबाधित एकूण 58 हजार 976 रुग्णांपैकी 55 हजार 838 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 285 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 853 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा -
सोलापूर जिल्हयातील कोरोनाबाधित एकूण 53 हजार 120 रुग्णांपैकी 50 हजार 397 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 877 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 846 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा -
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 48 हजार 538 रुग्णांपैकी 46 हजार 594 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 183 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 761 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा -
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 50 हजार 505 रुग्णांपैकी 48 हजार 429 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 331 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 745 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ -
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 414 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 211, सातारा जिल्ह्यात 58, सोलापूर जिल्ह्यात 93, सांगली जिल्ह्यात 24 तर कोल्हापूर जिल्ह्यात 28 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.