ETV Bharat / city

पुणे पोलीस दलातील 400 पोलीस कर्मचारी अन् अधिकारी कोरोना बाधित - पुणे पोलीस दलातील कर्मचारी व अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

पुणे शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. रस्त्यावर तसेच विविध बंदोबस्तात सहभागी होणारे पोलीसही कोरोना बाधित होऊ लागले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आतापर्यंत शहर पोलीस दलातील 400 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

police corona positive
police corona positive
author img

By

Published : Jan 14, 2022, 3:19 PM IST

Updated : Jan 14, 2022, 3:27 PM IST

पुणे - शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. रस्त्यावर तसेच विविध बंदोबस्तात सहभागी होणारे पोलीसही कोरोना बाधित होऊ लागले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आतापर्यंत शहर पोलीस दलातील 400 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. एक अतिरिक्त पोलीस आयुक्त, 2 डीसीपी आणि 45 अधिकारी मिळून एकूण 400 पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. यातील 4 जण रुग्णालयात दाखल असून बाकीच्या सर्वांना सौम्य लक्षणे असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
400 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह -
राज्यात कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना ही कोरोनाची लागण होत आहे. मुंबईत बहुसंख्य पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पुण्यात ही गेल्या काही दिवसात केलेल्या कोरोना चाचणीत पुण्यातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी मिळून साधारण 400 जण कोरोना बाधित झाले आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत जवळपास सर्वच पोलिसांची अँटिजेन कोरोना चाचणी करण्यात आली, यात 400 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
9 दिवसांमध्ये 30 हजार 985 नागरिक हे कोरोना पॉझिटिव्ह -
शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तर कोरोना रुग्णांचा आकडा हजारांच्या वर वाढत आहे. शहरात गेल्या 9 दिवसांमध्ये 30 हजार 985 नागरिक हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने शहरात चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे.

Last Updated : Jan 14, 2022, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.