ETV Bharat / city

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकासआघाडीचे उमेदवार विजयाच्या मार्गावर - Pune Teachers Constituency result

पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही बाद फेरीपर्यंत पोहोचली असून यामध्ये ही काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर आहेत. 20 व्या बाद फेरी अखेर जयंत आंसगावकर यांना 17 हजार 117 इतकी मते मिळालेली आहेत. तर अपक्ष उमेदवार आणि विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांना 11 हजार 161 इतकी मते मिळाली आहेत.

2nd round counting for Pune Teachers Constituency
पुणे शिक्षक मतदारसंघ
author img

By

Published : Dec 4, 2020, 6:48 AM IST

Updated : Dec 4, 2020, 7:39 AM IST

पुणे - विभागातील शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही बाद फेरीपर्यंत पोहोचली असून यामध्ये ही काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर आहेत. 20 व्या बाद फेरी अखेर जयंत आंसगावकर यांना 17 हजार 117 इतकी मते मिळालेली आहेत. तर अपक्ष उमेदवार आणि विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांना 11 हजार 161 इतकी मते मिळाली आहेत. भाजपचे उमेदवार जितेंद्र पवार इथे तिसऱ्या क्रमांकावरती आहेत. त्यांना पाच हजार 878 इतकी मते मिळाली आहेत. अद्याप ही मतमोजणी सुरू आहे.

या मतदारसंघातील पहिल्या पसंतीचा कोटा 25 हजार 114 इतका आहे. एकूण मतदान हे 53 हजार 10 इतके झाले होते. त्यातली 2,784 इतकी मतं अवैध ठरली असून 50 हजार 226 इतकी मतं मोजण्यात आली आहेत. आता शिक्षक मतदारसंघासाठी दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागणार आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाचा अधिकृत निकाल शुक्रवारी सकाळी मिळण्याची शक्यता आहे.

भाजप-काँग्रेसमध्ये चुरस -

शुक्रवारी सकाळी निवडणुकीचा निकाल लागू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पदवीधरसाठी भाजपचे संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांच्यात चुरस आहे. तर शिक्षक मतदार संघासाठी भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर यांच्यात चुरस आहे.

पदवीधर मतदारसंघाची परिस्थिती -

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपच्या या पारंपरिक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकण्याची चिन्हे दिसत आहेत. या मतदारसंघात 2,48,001 इतके एकूण मतदान झाले. यापैकी 1 लाख 23 हजार 200 मतांची मोजणी पूर्ण झाली असून त्यामध्ये राष्ट्रवादीचे अरुण लाड आघाडीवर आहे. लाड यांना आतापर्यंत 62 हजार 992 इतकी मते मिळालेली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे संग्राम देशमुख यांना 35 हजार 32 इतकी मते मिळाली आहेत.

हेही वाचा -'...तर पंजाब, हरयाणा पेक्षाही मोठा भडका उडल्याशिवाय राहणार नाही'

हेही वाचा -सोलापूर जिल्ह्यातले शिक्षक रणजीत डिसले यांना 7 कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार

Last Updated : Dec 4, 2020, 7:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.