ETV Bharat / city

Gram Panchayat Bogus Recruitment Pune : 14 ग्रामसेवकांसह दोन कृषी विस्तार अधिकारी निलंबित - Pune Municipal Corporation

20 ग्रामपंचायतीमध्ये बोगस नोकर भरती ( Bogus Servants Recruitment in 20 Gram Panchayats ) झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात 22 अधिकाऱ्यांवर आरोपपत्र ( Chargesheet Against 22 Officers ) दाखल करण्यात आले आहेत. त्यातील 16 जणांना निलंबित ( 16 Suspended ) करण्यात आले असून संबंधित ग्रामपंचायतीतील 212 माजी ग्रामपंचायत सदस्य ( 212 Notice to Former Gram Panchayat Members ) यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

पुणे जिल्हा परिषद इमारत
पुणे जिल्हा परिषद इमारत
author img

By

Published : Dec 20, 2021, 7:29 PM IST

Updated : Dec 20, 2021, 7:42 PM IST

पुणे - पुणे महानगरपालिकेत ( Pune Municipal Corporation ) समाविष्ट झालेल्या 20 ग्रामपंचायतीमध्ये बोगस नोकर भरती ( Bogus Servants Recruitment in 20 Gram Panchayats ) झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात 22 अधिकाऱ्यांवर आरोपपत्र ( Chargesheet Against 22 Officers ) दाखल करण्यात आले आहेत. त्यातील 16 जणांना निलंबित ( 16 Suspended ) करण्यात आले असून संबंधित ग्रामपंचायतीतील 212 माजी ग्रामपंचायत सदस्य ( 212 Notice to Former Gram Panchayat Members ) यांना नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ( Ayush Prasad CEO of Zilla Parishad Pune ) यांनी दिली आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी साधलेला संवाद
  • मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली कारवाई

पुणे महानगरपालिकेतील आसपासची गावे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया ज्यावेळी सुरू होती. त्याच दरम्यान ग्रामपंचायतीमध्ये बोगस भरती देखील केली जात होती. हा बोगस भरती प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत होता. त्या संबंधीच्या बातम्या देखील येत होत्या. मात्र त्यानंतर ही गावे पुन्हा समाविष्ट होण्यापूर्वीच ग्रामपंचायतीमध्ये चुकीच्या पद्धतीने कर्मचारी भरती करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यात आली. त्यावेळी तत्कालीन महिला व बाल विकास अधिकारी दत्तात्रेय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला. चौकशी केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकरी आयुष्य प्रसाद यांनी ही कारवाई केली आहे.

  • 'या' अधिकाऱ्यांची हकालपट्टी

ग्रामपंचायतीवर प्रशासक असताना अधिकाऱ्यांनी नियमबाह्य नोकर भरती केल्याचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार 14 ग्रामसेवक आणि दोन कृषी विस्तार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या 20 ग्रामपंचायती पुणे महापालिकेत जाण्यापूर्वी 658 जणांची भरती करण्यात आल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. चौकशी केली जाऊ नये, यासाठी प्रचंड दबाव आणि वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. मात्र सात हजारांपेक्षा जास्त पानांच्या कागदपत्रांचा अभ्यास करून चौकशी समितीने अहवाल सादर केला आहे, असे देखील यावेळी आयुष प्रसाद म्हणाले.

हेही वाचा - Pimpari Chinchwad Crime : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या 'गुन्हेगारी मुक्त पिंपरी-चिंचवड' संकल्पनेला तडा?

Last Updated : Dec 20, 2021, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.