ETV Bharat / city

पुण्यात मागील चोवीस तासात कोरोनाचे 11 बळी, 1705 नवे रुग्ण - पुणे कोरोना बातमी

पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 917 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाची बाधा झालेले 34040 रुग्ण सापडले आहेत.

corona
कोरोना
author img

By

Published : Jul 18, 2020, 1:27 AM IST

पुणे - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानाच आता या आजारामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होताना आढळून येत आहे. मागील 24 तासात पुणे शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात तब्बल 11 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात (शुक्रवार) पुणे शहरात कोरोनाचे 1705 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, 773 रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.

पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 917 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाची बाधा झालेले 34040 रुग्ण सापडले आहेत. यातील उपचाराअंती बऱ्या झालेल्या 21107 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही 12016 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील 527 रुग्ण गंभीर असून, यातील 82 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.