ETV Bharat / city

Omicron In Pune : परदेशातून पुण्यात आलेल्या 1 हजार नागरिकांचा पत्ता लागेना, ओमायक्रॉनच्या धोक्याची महापालिकेला भीती - पुण्यात आलेले परदेशी नागरिक

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या नागरिकांचे ड्रेसिंग करून त्यांच्या कोरोना टेस्ट करण्यात येत आहेत. (Municipal Corporation Pune) आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे रुग्ण (New Omicron patients) आढळलेल्या देशातून सुमारे 3 हजार 200 प्रवासी पुण्यात आले असून त्यातील 2 हजार 200 ड्रेसिंग करून करोना चाचणी करण्यात आली आहे. तर, तब्बल 1 हजार नागरिकांचा शोध अध्याप महापालिकेला लागलेला नाही.

परदेशातून पुण्यात आलेल्या  1 हजार नागरिकांचा पत्ता लागेना, ओमायक्रॉनच्या धोक्याची महापालिकेला भीती

author img

By

Published : Dec 16, 2021, 9:30 AM IST

Updated : Dec 16, 2021, 12:49 PM IST

पुणे - ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या नागरिकांचे ड्रेसिंग करून त्यांच्या कोरोना टेस्ट करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलेल्या देशातून सुमारे 3 हजार 200 प्रवासी पुण्यात आले असून त्यातील 2 हजार 200 ड्रेसिंग करून करोना चाचणी करण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation faces Omicron) तर, तब्बल1 हजार नागरिकांचा शोध अध्याप महापालिकेला लागलेला नाही.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी पथकांची निर्मिती

आफ्रिकेत आढळलेल्या 'ओमायक्रॉन' व्हेरिएंटचा संपूर्ण जगाने आता धसका घेतला असून, आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावरही बऱ्याच देशांनी निर्बंध आणले आहेत. त्यामुळे आता ज्या ज्या शहरात परदेशातून नागरिक येत आहेत, त्यांची कोरोना चाचणी करणे बंधनकारकच करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation Action Omicron) पुण्यातही परदेशातून आलेल्या सुमारे 3200 जणांची यादी महापालिकेकडे आहे, त्यांचेही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. यासाठी पालिकेकडून पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.

१२०० जणांची शोधून टेस्ट

परदेशांतून आलेल्या ७५० जणांची विमानतळावरच टेस्ट करण्यात आली असून, १,२०० जणांचे घरी आल्यानंतर महापालिकेने त्यांना शोधून त्यांची टेस्ट केली आहे. दरम्यान, पुणे मुंबई आणि नागपूर विमानतळांवर परदेशांतून नागरिक येतात. ज्या देशांत ओमायक्रॉन रुग्ण आढळलेले आहेत, अशा देशांतून या तीनही विमानतळांवर दि. १ डिसेंबरपासून आतापर्यंत ११ हजार ७५१ प्रवासी पुण्यात आले. तर, इतर जोखमीचे नसलेल्या देशांतून ६५ हजार ७७९ प्रवासी आले आहेत, असे महापालिका आरोग्य प्रमुख आशिष भरती यांनी सांगितले.

जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले १०७ नमूने

जोखमीच्या देशांतून आलेल्यापैकी २२ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर इतर देशातून पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या ८ आहे. क्षेत्रीय सर्वेक्षणातून ७७ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले असून सर्व मिळून १०७ जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंग करण्यासाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. यापैकी आतापर्यंत २० रुग्णांचे नमुने ओमायक्रॉनसाठी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर २० नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

ओमायक्रॉनचे ४ नवे रुग्ण -

आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ४ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी २ रुग्ण उस्मानाबाद, १ रुग्ण मुंबई येथील १ रुग्ण बुलढाणा येथील आहे. आजपर्यंत राज्यात एकूण ३२ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. एकूण ३२ रुग्णांपैकी मुंबई १३, पिंपरी चिंचवड १०, पुणे मनपा २, उस्मानाबाद २, कल्याण डोंबिवली १, नागपूर १, लातूर १, वसई विरार १ आणि बुलढाणा १ असे रुग्ण आढळून आले आहेत.

नागरिकांनी भीती बाळगू नये -

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

..या जिल्ह्यात ओमायक्रॉनचे रुग्ण -

मुंबई १३
पिंपरी चिंचवड १०
पुणे मनपा २
उस्मानाबाद २
कल्याण डोंबिवली १
नागपूर १
लातूर १
वसई विरार १
बुलढाणा १

हेही वाचा - Miss Universe 2021: 'मिस युनिव्हर्स' हरनाझ संधू मायदेशी परतली, मुंबईत जोरदार स्वागत

Last Updated : Dec 16, 2021, 12:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.