ETV Bharat / city

गोवा विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा संपन्न; उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत पदवी प्रदान सोहळा

गोवा विद्यापीठाच्या 32 वा दीक्षांत सोहळा पार पडला. यासाठी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. जगात नव्या संधींसोबतच नवी आव्हाने आहेत. त्यामुळे ध्येय निश्चित करा, असा संदेश नायडू यांनी दिला.

author img

By

Published : Feb 24, 2020, 5:19 PM IST

Updated : Feb 24, 2020, 10:21 PM IST

goa university convocation ceremony
गोवा विद्यापीठाच्या 32 वा दीक्षांत सोहळा पार पडला.

पणजी - गोवा विद्यापीठाच्या 32 वा दीक्षांत सोहळा पार पडला. यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. यावेळी खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण योग्य पद्धतीने हाताळल्यास मोठ्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या संधींसोबतच नवी आव्हाने आहेत. त्यामुळे ध्येय निश्चित करा, असा संदेश नायडू यांनी दिला.

कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याला गोवा विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उपस्थिती लावली. यासोबतच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कुलगुरू प्रा. वरुण सहानी, कुलसचिव वाय. व्ही. रेड्डी, आदी उपस्थित होते. यावेळी 77 विद्यार्थ्यांना (पीएचडी) प्रदान करण्यात आल्या. यामध्ये भाषाशास्त्राचे 9, समाजशास्त्र 1, निसर्गशास्त्र 4, पर्यावरण शास्त्र 14, कायदा 3, रसायनशास्त्र 4, समुद्र विज्ञान 21, व्यावसायिक अभ्यासक्रम 21 जणांना पदवी प्रदान करण्यात आल्या. तसेच विविध शाखांतील 87 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्रांचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते वितरण करण्यात आले.

उपराष्ट्रपतींनी कोकणी भाषेत भाषणाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी महिलांना मिळणाऱ्या शैक्षणिक संधींबद्दल भाष्य केले. शिक्षण माणसाला विकासाची संधी देते. विशेषतः मुलींना शिक्षण दिल्याने संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते, असे ते म्हणाले. विदेशात जाण्याची इच्छा झाल्यास हरकत नसावी. परंतु, आपल्या मात्रूभूमी विषयीचे कर्तव्य विसरता नये, असा कानमंत्र त्यांनी यावेळी दिला.

Last Updated : Feb 24, 2020, 10:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.