पणजी- पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर आता मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी गोव्याकडे आपले लक्ष वळवले आहे. आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणुका (goa assembly elections) होणार असून ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) गोव्यात (Goa) आपला पाय रोवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुईजिन्हो फलेरो ( Luizinho Faleiro) यांना तृणमूल काँग्रेसने (TMC) राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुईजिन्हो फलेरो (Luizinho Faleiro) यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. फालेरो हे नवेलिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. यानंत त्यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला होता.
गोव्यात विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. 2017 मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 17 जागा जिंकल्या होत्या. पण नंतर आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला. जुलै 2019 मध्ये 10 आमदारांनी काँग्रेस सोडली आणि सत्ताधारी भाजपामध्ये प्रवेश केला होता. सध्या गोव्यात भाजपाचे सरकार आहे. गोव्यात काँग्रेस (Indian National Congress) हा सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र, भाजपाने मित्रपक्षांसोबत आघाडी करत काँग्रेसला सत्तेपासून वंचित ठेवलं. काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून देखील त्यांच्या पदरी निराशा आली.
गोव्यात पुढील वर्षीच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होत आहेत. पक्षाच्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या महिन्यात गोव्यात अनेक जाहीर सभा घेतल्या. ज्यात फालेरो आणि इतर स्थानिक नेते देखील उपस्थित होते. राजकीय समालोचकांच्या मते, तृणमूलकडून राज्यात संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.