ETV Bharat / city

Goa Assembly Election : गोव्यात किती महिला विधानसभेच्या रिंगणात, याबद्दलचा विशेष 'रिपोर्ताज'... - गोवा निवडणुकीत महिलांचे स्थान

गोव्यात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सर्वंच पक्ष हे महिला ( Women in Goa Assembly Election ) सक्षमीकरणाच्या गप्पा मारणारे आहेत. गोवा जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वच पक्षांनी किती महिलांना ( Women Candidates in Goa Assembly Election ) उमेदवारी दिली आहे आणि एकूण किती महिला उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. याबद्दलचा हा विशेष 'रिपोर्ताज'...

women Candidate in Goa Assembly Election
गोव्यात महिला उमेदवार रिंगणात
author img

By

Published : Feb 12, 2022, 7:58 PM IST

Updated : Feb 14, 2022, 7:27 AM IST

पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुमश्चक्री आता जोरदार सुरू आहे. गोवा विधानसभेच्या (Goa Assembly Election 2022) 40 जागांसाठी 14 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. काँग्रेस, भाजपा, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस युती यासह निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि ममता बॅनर्जी यांचा तृणमूलही आपलं नशीब अजमावणार आहे. स्थानिक पक्षांनीही कंबर कसली आहे. त्यामुळे गोव्यात कोणाचं सरकार येणार? हे 10 मार्च रोजी समजणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सर्वंच पक्ष हे महिला ( Women in Goa Assembly Election ) सक्षमीकरणाच्या गप्पा मारणारे आहेत. गोवा जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वच पक्षांनी किती महिलांना ( Women Candidates in Goa Assembly Election ) उमेदवारी दिली आहे आणि एकूण किती महिला उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. याबद्दलचा हा विशेष रिपोर्ताज...

Special report on how many women candidates will  Contest Goa Assembly Election 2022
गोव्यात महिला विधानसभेच्या रिंगणात

गोव्यात 11,56,762 मतदाते 1722 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावतील. यात 5 लाख 62 हजार 790 पुरुष आणि 5 लाख 93 हजार 968 महिला तर 4 ट्रान्सजेंडरचा समावेश आहे. गोव्यात 301 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यात फक्त 26 महिला उमेदवारांना तिकिट देण्यात आले आहे. यात 25 मतदारसंघात एकही महिला उमेदवार दिलेली नाही. तर सात मतदारसंघात प्रत्येकी एक महिला उमेदवार म्हणजे सात महिला, सहा मतदारसंघात प्रत्येकी 2 महिला म्हणजेच 12 महिला, एका मतदारसंघात 2 महिला आणि एका मतदारसंघात 4 महिला निवडणुकीत उभ्या आहेत. तर एकूण 26 महिला उमेदवार रिंगणात उतरल्या आहेत. यातील चार महिला उमेदवारांचे वय हे 25 ते 35, चौदा महिला उमेदवारांचे वय हे 36 ते 45, पाच महिला उमेदवारांचे वय हे 46 ते 55, एका महिला उमेदवाराचे वय 56 ते 65 आणि दोन महिला उमेदवार वय हे 65 पेक्षा जास्त आहे.

पक्षनिहाय उमेदवारी -

अपक्ष म्हणून 6 महिला उमेदवार रिंगणात आहेत. भारतीय जनता पक्षाने ( Goa BJP women Candidate ) 40 जागावर आपले उमेदवार उभे केले आहेत. यापैकी केवळ 3 महिला उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने 39 जागा लढवल्या आहेत. या पैकी 3 जागांवर त्यांनी महिलांना प्रतिनिधित्व दिले आहे. क्रांतिकारी गोवा पक्ष (RGP) हा 38 जागा लढवणार असून या पक्षाने 2 महिलांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस ( Congress women Candidate ) पक्षाने 37 जागा लढविण्याचा निर्धार केला असून यात 2 महिलांना तिकिट दिले आहे. ममता बॅनर्जी यांच्या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस ( TMC Women Candidate ) या पक्षाने 26 जागा लढवल्या आहेत. तृणमूल काँग्रेसने 4 महिलांना उमेदवारी दिली आहे. जी सर्वाधिक आहे. एमएजी (MAG) पक्षाकडून 1 आणि एसएस (SS) पक्ष 11 जागा लढवणार असून त्यांनी 2 महिलांना रिंगणात उतरवलं आहे. तर गोयंचो स्वाभिमान पक्ष (GSP) चार जागा लढवणार असून त्यांनी 1 महिलेला तिकिट दिलं आहे. यासोबत एसबीपी (SBP) पक्ष तीन ठिकाणी आपले उमेदवार उतरले असून यात 2 महिलांना तिकिट दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने गोव्यात युती केली असून राष्ट्रवादी काँग्रेस 13 जागांवर तर शिवसेना 9 जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र, महाराष्ट्रात महिलांचा पुरस्कार करणाऱ्या आघाडीने गोव्यामध्ये एकाही महिलेला प्रतिनिधित्व दिलेला नाही. तसेच तृणमूलसोबत युती केलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने एकाही महिलेला उमेदवारी दिलेली नाही.

पक्षअपक्षभाजपआपक्रांतिकारी गोवा पक्षकाँग्रेसटीएमसीएमएजी (MAG)एसएस (SS)जीएसपी (GSP)एसबीपी (SBP)
एकूण6332241212
टक्केवारी9%8%8%5%5%15%8%18%25%67%

बडे नेते सपत्नीक मैदानात -

कित्येक महिलांच्या पतीचे मतदारसंघात वजन असल्यानेच तिकीट दिले असल्याचा दावा ज्येष्ठ पत्रकार अनिल लाड यांनी केला आहे. महिला राजकारणात असल्या तरी त्यांना योग्य प्रतिनिधित्व विधानसभेत देण्याबाबत गोव्यातील कोणत्याच पक्षाला सोयरसुतक नसल्याचं दिसून येत आहे. भाजपाने पणजी मतदारसंघातून बाबुष मोन्सेरात तर त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात यांना तालीगाव मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. विश्वजित राणे यांना वालपाई तर त्यांची पत्नी डॉ विद्या राणे यांना पर्यें मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने नुकतेच भाजपला रामराम ठोकून पक्षात आलेल्या मायकल लोबो यांना कलंगुट तर त्यांची पत्नी डीलियाना यांना शिवोली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तृणमूल काँग्रेसच्यावतीने थिवी मतदारसंघातून कविता कांडोळकर तर हल्डोना मतदारसंघातून किरण कांदोलकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सांगे मतदारसंघातून चंद्रकांत कावळेकर यांची पत्नी सावित्री कवलेकर अपक्ष निवडणूक लढविणार आहे.

आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये महिलांचे स्थान....

2002 मध्ये राजकीय पक्षांनी 11 महिलांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी केवळ एकच महिला निवडून आली होती. 2007 मध्ये 14 महिलांना आणि 2012 मध्ये 10 महिलांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यापैकी प्रत्येकी 1 महिला निवडून आली होती. 2017 चा विचार केला तर 19 महिलांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यात केवळ 2 महिला निवडून आल्या होत्या.

हेही वाचा - Goa AAP : काँग्रेसला मत म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपाला मत - अरविंद केजरीवाल

हेही वाचा - Goa Election 2022 : सगळी गणितं बिघडवणारी 'गोव्याची निवडणूक' जाणकारांच्या नजरेतून...

Last Updated : Feb 14, 2022, 7:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.