ETV Bharat / city

गोव्यात अंमली पदार्थांची विक्री करताना रशियन नागरिकाला अटक - Goa police on Narcotics smuggling

पेडणे पोलिसांनी अमली पदार्थांचे एलएसडी आणि गांजा विक्री करणाऱ्या एका रशियन नागरिकाला अटक केली आहे.

गोव्यात ८ लाख ५० हजार रुपयांच्या अमली पदार्थांची विक्री करताना रशियन नागरिकाला अटक

author img

By

Published : Jun 9, 2021, 10:01 PM IST

पणजी (गोवा) - पेडणे पोलिसांनी अमली पदार्थांचे एलएसडी आणि गांजा विक्री करणाऱ्या एका रशियन नागरिकाला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक जिवाबा दळवी यांनी ही कारवाई केली आहे. तब्ब्ल ८ लाख ५० हजार रुपयांचा अंमली पदार्थांचा माल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे.

पेडणे पोलिसांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक जिवाबा दळवी यांना त्यांच्या सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार आरोपी मोरजिम येथे ड्रग्स घेऊन येणार असल्याचे समजले होते. म्हणून पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या पथकाने अचानक छापा टाकला. त्या दरम्यान परदेशी नागरिक असलेल्या या आरोपीच्या ताब्यात एलएसडी व गांजा असा अंमली पदार्थ सापडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत ८ लाख ५० हजार इतकी आहे.

आरोपी रशियन नागरिकाला घेतले ताब्यात
पंचनामा करून मुद्देमाल व आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिमित्री बोल्डोव (वय ४१ वर्ष, राहणार रशिया) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीविरूद्ध एनडीपीएस कलम २० (बी) (२) (अ) आणि २२ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा आरोपी जिथे उतरला होता. त्या गेस्ट हाऊस मालकाने आरोपी परदेशी नागरिकाचा सी फॉर्म भरला नाही आणि म्हणूनच परदेशी कायद्याच्या कलम १४ अंतर्गत दुसरा गुन्हा स्वतंत्रपणे नोंदविला गेला आहे.

गोवा पोलीस करताहेत अधिक तपास
पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जीवबा दळवी यांच्यासह पीएसआय हरीश वैंगणकर, हवालदार विनोद पेडणेकर, रोहन वेल्गेनकर, देश खांडेकर, विष्णू गड आणि महेश नाईक यांनी या छाप्यात सहभाग घेतला होता. दरम्यान एसडीपीओ गजानन प्रभुदेसाई आणि उत्तर गोव्याचे एसपी शोबीत सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.