ETV Bharat / city

गोव्यातील नियमित बाह्यरुग्ण विभाग कार्यरत, सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना - lockdown in goa

सर्व रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात आवश्यक काळजी घेत सुरक्षेचे उपाय करण्यात आले आहेत. रुग्णांना कसे तपासावे याची माहिती देण्यात आली आहे. तसेच थर्मल गन वापरून येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची तपासणी केली जाणार आहे. यामुळे, कोणामध्ये काही लक्षणे आढळली तर तात्काळ गर्दीपासून वेगळे करणे सोपे जाईल.

गोव्यातील नियमित बाह्यरुग्ण विभाग कार्यरत

author img

By

Published : May 6, 2020, 9:21 AM IST

पणजी - गोव्यातील सर्वच रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आले आहेत. हे करत असताना शारीरिक अंतर ठेवणे तसेच गर्दी होणार नाही याकडे लक्ष दिले जाणार आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी याबद्दलची माहिती दिली.

डॉ. बांदेकर म्हणाले, सर्व रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात आवश्यक काळजी घेत सुरक्षेचे उपाय करण्यात आले आहेत. रुग्णांना कसे तपासावे याची माहिती देण्यात आली आहे. तसेच थर्मल गन वापरून येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची तपासणी केली जाणार आहे. यामुळे, कोणामध्ये काही लक्षणे आढळली तर तात्काळ गर्दीपासून वेगळे करणे सोपे जाईल. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या बाह्यरुग्ण विभागात मंगळवारी दिवसभरात 350 रुग्णांची तपासणी करण्यात आली.

आरोग्य मंत्र्यांची आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा

बाह्यरुग्ण विभाग कशाप्रकारे सुरु करता येईल याविषयी सोमवारी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आरोग्य अधिकारी आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली होती. या संदर्भात राणे यांनी माहिती देताना म्हटले आहे, की कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सर्वप्रकारची काळजी आणि सुरक्षा घेतली जात आहे. गोमेकॉचे 50 टक्के कर्मचारी यासाठी काम करत आहेत. त्यामुळे, तात्पुरत्या स्वरूपात राज्यातील रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी शारीरिक अंतराचे पालन आणि अन्य सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याकरता आवश्यक साधनसामग्री आणि सुरक्षा पुरविण्यात येईल, याची खात्री देण्यात आली आहे. या बैठकीला राज्याचे संयुक्त आरोग्य सचिव अजित पावसकर, आरोग्य संचालक डॉ. ज्यो डिसा, गोवा वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर आणि अन्य आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.