पणजी - काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Traditional Dance) शुक्रवारी गोवा दौऱ्यावर होत्या. गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या गोव्यात पोहचल्या. काही दिवसांपूर्वीच गोव्यात काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने (Goa Forward Party) युती करत सत्तेत असणाऱ्या भाजपला धक्का दिला होता. शुक्रवारी निवडणूक प्रचाराचा शुभारंभ प्रियंका गांधी यांनी केला. यावेळी प्रियंका गांधी आदिवासी महिलांना अभिवादन करताना आणि पारंपारिक नृत्य करताना दिसल्या. 45 सेकंदांचा एक व्हिडिओ काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे.
-
#WATCH Priyanka Gandhi Vadra performs traditional dance with the tribal women at Morpirla village in South Goa pic.twitter.com/qpf7hNaHd4
— ANI (@ANI) December 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Priyanka Gandhi Vadra performs traditional dance with the tribal women at Morpirla village in South Goa pic.twitter.com/qpf7hNaHd4
— ANI (@ANI) December 10, 2021#WATCH Priyanka Gandhi Vadra performs traditional dance with the tribal women at Morpirla village in South Goa pic.twitter.com/qpf7hNaHd4
— ANI (@ANI) December 10, 2021
लाल आणि जांभळ्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या आदिवासी महिलांसोबत ढोलाच्या तालावर ठेका प्रियांका गांधी यांनी (Priyanka Gandhi Traditional Dance With Tribal Woman) धरला. गोवा विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. शिवसेनाही गेल्या अनेक वर्षांपासून गोवा विधानसभा निवडणुका लढवत असून पुढील वर्षीही गोव्यात शिवसेना 20 ते 25 जागा लढणार असल्याची माहिती आहे. सध्या गोव्यात भाजपाचे सरकार आहे. गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र, भाजपाने मित्रपक्षांसोबत आघाडी करत काँग्रेसला सत्तेपासून वंचित ठेवलं. काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून देखील त्यांच्या पदरी निराशा आली.
आगामी काळात उत्तर प्रदेश व गोवामध्ये विधानसभा (Goa elections 2022) निवडणूक होत आहे. आता शिवसेनेकडूनही या निवडणुकांसाठी काँग्रेसशी हातमिळणी करण्याचे संकेत देण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्ह आहेत.
गोवा विधानसभेतील संख्याबळ -
एकूण जागा 40 आहेत. यात काँग्रेसकडे 17, भाजपाकडे 13 ,महाराष्ट्र गोमंतक पार्टी 3, अपक्ष 3, गोवा फॉरवर्ड पार्टी 3 आणि राष्ट्रवादीकडे 1 जागा आहे.