ETV Bharat / city

Goa Election 2022 : गोव्याचा कौल कुणाला? राजकीय परिस्थितीवर एक नजर - गोव्याचा कौल कुणाला

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या जुन्या पक्षांसोबतच टीएमसी, आरजीपी, जय महाभारत पार्टी, गोएंचो स्वाभिमान पक्ष आणि संभाजी ब्रिगेड या पक्षांनीही आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. गोवा विधानसभेचा कार्यकाळ हा 15 मार्चला संपत आहे. गोव्यात पूर्ण बहुमताचे सरकार ( Who Will Become Next CM Of Goa ) स्थापन होणार की त्रिशंकू विधानसभा होणार हे 10 मार्चला कळणार आहे. त्यामुळे भाजपला पूर्ण बहुमत मिळणार की त्रिशंकू विधानसभा (Hung Assembly in Goa) होणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. गोव्यात गेल्या 10 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भापजला यावेळी सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागतोय. गोव्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा ( current political situation in goa ) ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.

Political parties in Goa swung into action after Exit polls
Goa Election 2022 : गोव्याचा कौल कुणाला? राजकीय परिस्थितीवर एक नजर
author img

By

Published : Mar 9, 2022, 5:30 PM IST

गोवा (पणजी) - गोवा विधानसभेत 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान ( Goa Election 2022 ) झाले आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या जुन्या पक्षांसोबतच टीएमसी, आरजीपी, जय महाभारत पार्टी, गोएंचो स्वाभिमान पक्ष आणि संभाजी ब्रिगेड या पक्षांनीही आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. गोवा विधानसभेचा कार्यकाळ हा 15 मार्चला संपत आहे. गोव्यात पूर्ण बहुमताचे सरकार ( Who Will Become Next CM Of Goa ) स्थापन होणार की त्रिशंकू विधानसभा होणार हे 10 मार्चला कळणार आहे. त्यामुळे भाजपला पूर्ण बहुमत मिळणार की त्रिशंकू विधानसभा (Hung Assembly in Goa) होणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. गोव्यात गेल्या 10 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भापजला यावेळी सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागतोय. गोव्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा ( current political situation in goa ) ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.

त्रिशंकू -

प्रादेशिक पक्षांच्या दमदार कामगिरीमुळे गोव्यात अनेकदा त्रिशंकू विधानसभा झाल्या आहेत. 1999 आणि 2012 विधानसभा निवडणूक निकाल याला मात्र अपवाद आहेत. 1999 मध्ये काँग्रेसला 21 तर भाजपला 2012 मध्ये 21 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर येथील पक्षांतराचे वातावरण आणि निवडणुकीनंतरचे नवे समीकरणं जुळत गेली आहेत. यंदाही गोव्यात त्रिशंकू विधानसभेचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष -

गोव्यातील 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. पण सरकार स्थापन करण्यास भाजप यशस्वी झाले. त्यावेळी मनोहर पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री झाले होते. मात्र, पर्रीकर यांना कर्करोगासारख्या आजाराने ग्रासले, तरीही त्यांचे निधन होईपर्यंत म्हणजे 17 मार्च 2019 पर्यंत ते मुख्यमंत्री पदावर होते. त्यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री करण्यात आले आणि भाजप सध्या त्यांच्याबरोबर निवडणूक लढत आहे.

काँग्रेसची सावध भूमिका -

निकालापूर्वीच काँग्रेसने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने महत्त्वाच्या नेत्यांना निवडणूक राज्यांमध्ये पाठवले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही आठवड्यांपूर्वी यासंदर्भात बैठक घेतली होती. काँग्रेसने खबरदारी म्हणून आपल्या उमेदवारांना सुरक्षित गोव्यातील बीच रिसॉर्टमध्ये हलवले आहे.

गोव्यातील मतदानाची टक्केवारी -

गोव्यात 40 विधानसभा जागांसाठी झालेल्या मतदानात 78.94 टक्के ( Goa Voting Percentage )इतके उच्च मतदान झाले आहे. मतदानाची टक्केवारी उत्तर गोव्यातील सांखलीम मतदारसंघात सर्वाधिक 89.61 टक्के मतदान झाले, तर दक्षिण गोव्यातील बेनौलीम येथे सर्वात कमी 70.20 टक्के मतदान झाले. एकूण 301 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. महिला मतदार गोव्यात पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत. निवडणूक आयोगानुसार, गोव्यात एकूण 11,56,460 मतदार आहेत ज्यात 5,93,960 महिला आणि 5,62,500 पुरुष मतदार आहेत. पुरुषांपेक्षा 31,460 महिला मतदार जास्त आहेत. असे असूनही, फार कमी महिलांना ( Goa Female Voters ) राजकीय पक्षांनी उमेदवार म्हणून उभे केले आहे.

ख्रिश्चन लोकसंख्या -

गोव्यात 33% ख्रिश्चन लोकसंख्या आहे. 40 पैकी 15 मतदारसंघांमध्ये ख्रिश्चनांचा मोठा प्रभाव आहे. गोव्यातील तळेगाव, कुंकोली, नावेली, नुवेम, कलंगुट, आंद्रे, वेलीम, अल्दोना, दाभोली, सेंटक्रूझ, कर्टोरी, सिलीम, कुरचेड, बेनोली आणि फरतोडा येथे ख्रिश्चन मतदारांचा मोठा प्रभाव आहे.

भंडारी समाजाचे प्राबल्य -

गोव्यातील 18 मतदारसंघांवर ओबीसी समाजातील भंडारी या जातीचा प्रभाव असल्याची चर्चा आहे. हीच बाब हेरून आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भंडारी समाजाचा उमेदवार मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करून नवीन गणित मांडली. गोव्यातील मांद्रे, शिरोडा, शिवोली, पोंडा, सालेगाव, मार्मुगोवा, दाभोली, म्हापसा, तालेगाव,मये,वापई, कांडकोर, मडकई, सांगेई, कुठाळी, पेडणे,सावर्डे आणि कुरचडे या मतदारसंघांमध्ये भंडारी समाजाचे मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे. त्यामुळे या मतदारसंघांमधून जर भंडारी समाजाच्या उमेदवारांचा विजय झाला तर मुख्यमंत्रीपदासाठी आणि एकूणच सत्ता काबीज करण्यासाठी भंडारी समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे.

उमेदवारांची संख्या -

काँग्रेसने37 उमेदवार उभे केले आणि त्याचा मित्र GFP (गोवा फॉरवर्ड पार्टी) 3 मतदारसंघात, तर भाजपा सर्व 40 जागांवर निवडणूक लढवत आहे. आप ने 39 जागा लढवल्या आहेत. TMC ने 26 तर MGP (महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी) 13 जागा लढवत आहेत. तसेच 68 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

उमेदवारांनी घेतली शपथ -

गोव्यातील आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी शपथपत्रांवर स्वाक्षरी केली आहे. त्यांनी राज्यातील मतदारांप्रती निष्ठेची शपथ दिली. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या सर्व 36 उमेदवारांनी मंदिर, चर्च आणि मशीद या तीन धार्मिक संस्थांमध्ये पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे वचन दिले आहे. महालक्ष्मी मंदिर आणि बांबोलीम क्रॉस चर्च आणि नंतर बेटीम येथील हमजा शाह दर्गा येथे पुजाऱ्यांनी उमेदवारांना शपथ दिली.

पक्षांतर आणि लढत -

2017 साली 40 पैकी सर्वाधिक जागा जिंकून काँग्रेस राज्यातील पहिला पक्ष ठरला होता. मात्र अंतर्गत वादामुळे बहुमताच्या आकड्यांचा खेळ न जुळवता आल्यामुळे काँग्रेस पक्षाला सत्तेपासून वंचित राहावे लागले होते. जुलै 2019 मध्ये, विधानसभेतील विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातील काँग्रेसच्या 10 आमदारांचा गट सत्ताधारी भाजपामध्ये विलीन झाला होता. या 10 मधील 7 बंडखोर आमदार यंदा भाजपाच्या तिकिटावर 2022 ची निवडणूक लढवत आहेत. तर दोन अपक्ष आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आहे. काँग्रेला रामराम ठोकत भाजपात चंद्रकांत कवळेकर (क्यूपेम, भाजपा), फिलीप नेरी रॉड्रिग्ज (वेलीम, राष्ट्रवादी), जेनिफर मोन्सेरात (तलेगाव, भाजपा), इजिदोर फर्नांडिस (कानाकोना, आयएनडी), निळकंठ हळर्णकर(तिविम, भाजप), बाबूश मोन्सेराते (भाजपा), अन्टोनी फर्नांडिस (सेंट क्रूज, भाजपा), फ्रान्सिस सिल्वेरा (सेंट आंद्रे, भाजपा), विल्फ्रेड (नुवेम, IND) आणि क्लाफास डायस (कंकोलिम, भाजपा) या 10 आमदारांनी प्रवेश केला होता.

प्रमुख उमेदवार -

  • प्रमोद सावंत (पक्ष- भाजप, मतदारसंघ- सांकेलीम)
  • दिगंबर कामत (पक्ष- काँग्रेस, मतदारसंघ- मडगाव)
  • लक्ष्मीकांत पार्सेकर (पक्ष- अपक्ष, मतदारसंघ- मंद्रेम)
  • उत्पल पर्रीकर (पक्ष- अपक्ष, मंथरेम)
  • लोबो (पक्ष- काँग्रेस, मतदारसंघ- कळंगुट)
  • दयानंद मांद्रेकर (पक्ष- भाजप, मतदारसंघ- सिओलिम)
  • चर्चिल आलेमाओ (पक्ष- टीएमसी, मतदारसंघ- बेनौलिम)
  • विजय सरदेसाई (पक्ष- जीएफपी, मतदारसंघ- फातोर्डा)
  • अतानरातेस (पार्टी- जीएफपी, मतदारसंघ- फातोर्डा)
  • बाबूश मोन्सेरात (पक्ष- भाजप, मतदारसंघ- पणजी)
  • विश्वजित राणे (पक्ष- भाजप, मतदारसंघ- वाळपोई)
  • अमित पालेकर (पक्ष- आप, मतदारसंघ- सेंट क्रूझ).
  • मनोहर आजगावकर (पक्ष- भाजप, मतदारसंघ- मडगाव)
  • मिलिंद नाईक (पक्ष- भाजप, मतदारसंघ- मुरगाव)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.