ETV Bharat / city

मतदारांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी 'आप' उमेदवाराकडून प्रतिज्ञापत्र, पक्षांतर न करण्याचे दिले आश्वासन - APP

मतदारांचा राजकारण्यांवरील विश्वास टिकून रहावा यासाठी पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार वाल्मिकी नाईक यांनी चक्क प्रतिज्ञापत्र तयार करून पक्षांतर न करण्याचे मतदारांना आश्वासन दिले आहे.

आम आदमी पक्षाचे उमेदवार वाल्मिकी नाईक
author img

By

Published : May 7, 2019, 12:47 PM IST

पणजी- प्रस्तावित पक्षांकडून एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप आणि सतत होणाऱ्या पक्षांतरामुळे मतदारांचा उमेदवारांवर विश्वास उडत चालला आहे. मतदारांचा राजकारण्यांवरील विश्वास टिकून रहावा यासाठी पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार वाल्मिकी नाईक यांनी चक्क प्रतिज्ञापत्र तयार करून पक्षांतर न करण्याचे मतदारांना आश्वासन दिले आहे.

मिरामार येथील पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नाईक म्हणाले, भाजपकडून २०१५ मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी तर २०१७ मध्ये काँग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी दोन्ही वेळच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देऊ केली होती. परंतु राजकारण बदलण्याच्या उद्देशाने राजकारणात प्रवेश केल्याने उमेदवारी स्विकारली नाही.

आम आदमी पक्षाचे उमेदवार वाल्मिकी नाईक

मागील काही दिवस काँग्रेस आणि भाजपकडून एकमेकांवर होत असलेले आरोप-प्रत्यारोप आणि पक्षांतर यामुळे सर्वसामान्य मतदार उमेदवार अथवा राजकीय नेत्यांवर विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचे दिसून आले. त्यामुळे 'आप' उमेदवार म्हणून लोकांसमोर जाताना त्यांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी नोटरीकरवी प्रतिज्ञापत्र केले आहे. ज्याची छायांकित प्रत मतदारांना वितरित करणार आहे.

पणजी पोटनिवडणुकीत मतदारांनी विधानसभा सदस्य म्हणून निवडून दिले तर भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असे या प्रतिज्ञापत्रात नमूद केले असल्याचे नाईक यांनी सांगितले. तसेच जर काँग्रेस सरकार बनवत असेल तर काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देईन. ज्या प्रकारे आप उमेदवाराने प्रतिज्ञापत्र तयार केले आहे. तसे काँगेस आणि गोवा सुरक्षा मंच यांच्या उमेदवारांनी करावे, असे आवाहनही नाईक यांनी केले.

युवकांनी भवितव्याचा विचार करून मतदान करावे : एल्वीस गोम्स

१८ ते ३० वयोगटातील युवकांनी मतदान करताना आपल्या भवितव्याचा विचार करून करावे. यावेळी राजकारण बदलण्याची युवकांना संधी आहे. पणजी मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे, असे आपचे गोवा संयोजक एल्वीस गोम्स यावेळी म्हणाले.

Intro:पणजी : प्रस्तावित पक्षांकडून एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप आणि सतत होणाऱ्या पक्षांतरामुळे मतदार उमेदवारांवर विश्वास ठेवण्यास मागेपुढे पाहत आहेत. यामुळे मतदारांचा राजकारणांवरील विश्वास टिकून रहावा यासाठी पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार वाल्मिकी नाईक यांनी चक्क प्रतिज्ञापत्र तयार करून पक्षांतर न करण्याचे मतदारांना आश्वासन दिले आहे.

Body:मिरामार येथील पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नाईक म्हणाले, भाजपकडून 2015 मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी तर 2017 मध्ये काँग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी दोन्ही वेळच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देऊ केली होती. परंतु, ज्या उद्देशाने राजकारणात प्रवेश केला आहे. राजकारण बदलावयाचे आहे. परंतु, मागील काही दिवस काँग्रेस आणि भाजपकडून एकमेकांवर होत असलेले आरोप-प्रत्यारोप आणि पक्षांतर यामुळे सर्वसामान्य मतदार उमेदवार अथवा राजकीय नेत्यांवर विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचे दिसून आले. त्यामुळे 'आप' उमेदवार म्हणून लोकांसमोर जातांना त्यांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी नोटरीकरवी प्रतिज्ञापत्र केले आहे. ज्याची छायांकित प्रत मतदारांना वितरित करणार आहे.
पणजी पोटनिवडणुकीत मतदारांनी विधानसभा सदस्य म्हणून निवडून दिले तर भाजपमध्ये जाणार नाही अथवा भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असे या प्रतिज्ञापत्रात नमचद केले असल्याचे नाईक यांनी सांगितले. तसेच जर काँग्रेस सरकार बनवत असेल तर काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देईन. ज्या प्रकारे आप उमेदवारांने प्रतिज्ञापत्र तयार केले आहे. तसे काँगेस आणि गोवा सुरक्षामंच यांच्या उमेदवारांनी करावे, असे आवाहनही नाईक यांनी केले.
युवकांनी भवितव्याचा विचार करून मतदान करावे : एल्वीस गोम्स
18 ते 30 वयोगटातील युवकांनी मतदान करताना आपल्या भवितव्याचा विचार करून करावे. यावेळी राजकारण बदलण्याची युवकांना संधी आहे. पणजी मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे, असे आपचे गोवा संयोजक एल्वीस गोम्स यावेळी म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.